आहारविहारातून होता येते शतायुषी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

नागपूर : नियमित व्यायाम, सात्त्विक आहार घेण्यासोबतच सकारात्मक विचारातून निरोगी व निरामय आयुष्य जगता येते, असा सूर "शंभर वर्षे कसे जगावे...!' या विषयावरील परिसंवादातून पुढे आला. यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेद्वारे महाएएमएसकॉन व निमॅकॉन-2019 परिषदेचा डॉ. अनिल लद्धढ यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला.

या प्रसंगी प्रसिद्ध लैंगिकरोगतज्ज्ञ डॉ. संजय देशपांडे, मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता, डॉ. वर्षा झुनझुनवाला, आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता, डॉ. दिवाकर भोयर, डॉ. शंकर खोब्रागडे उपस्थित होते. समाजातील तरुण-तरुणी करिअरच्या पाठीमागे धावत आहे. किती धावायचे, हे त्यांना माहीत नाही. धावता-धावता ते शरीरासाठी आवश्‍यक असे लैंगिक संबंधाकडे दुर्लक्ष करतात. लैंगिकतेला महत्त्व देत नाही. या धकाधकीच्या काळात मनभेद होतात आणि सुखी समाधानी आयुष्याला ग्रहण लागते. वैवाहिक सौख्य वाढविण्यावर भर दिला पाहिजे, असे डॉ. संजय देशपांडे म्हणाले. डॉ. सुनील गुप्ता यांनी चाळिशीनंतर आहारविहाराकडे लक्ष द्यावे, असा सल्ला दिला. चाळिशीनंतर रक्त तपासणीतून रक्तशर्करा, रक्तदाब यांची नियमित तपासणी करावी, अशी सूचनाही केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IMA close ceremony news