esakal | कोणाचा प्लाझ्मा ठरणार कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी? वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

plazma final.j

रुग्णालयातून सुटी झाल्यावर २८ दिवसांच्या कालावधी नंतर कोविड आजारातून बरे झालेल्या व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यास पात्र आहेत. प्लाझ्मा दान करण्यासाठी सुमारे ४५-६० मिनिटे लागतात.

कोणाचा प्लाझ्मा ठरणार कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी? वाचाच

sakal_logo
By
रुपेश खैरी

वर्धा :  सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटलची ब्लड बँक आणि महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेने आजपासून कोविड प्लाझ्मा संकलन सुरू केले आहे. कोविड -१९ संसर्गातुन मुक्त झालेल्या व्यक्तींमध्ये रक्तात अँटीबॉडी तयार होत असतात, ज्या कोरोना विषाणूंविरूद्ध लढायला मदत करतात. बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मामुळे संसर्गग्रस्त रूग्णांची रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते आणि रुग्ण कोरोनातून लवकर बरा होतो. या सुविधेमुळे कोरोना संसर्गित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढणार असून अशी सुविधा उपलब्ध असलेला वर्धा हा नागपूर विभागातील दुसरा जिल्हा आहे.

कोरोनातून बरे झालेले उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार हे प्रथम प्लाझ्मा दाता होते. तसेच कोविड संसर्गापासून बरे झालेले सुधांशु डूकरे, यांनीही प्लाझ्मा दान केले.
जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या उपस्थितीत प्लाझ्मा दान करण्यास सुरुवात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले उपस्थितीत होते. कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे विश्वस्त पी. एल. तापडिया, कस्तूरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्रामचे सचिव डॉ. बी.एस. गर्ग, एम.जी.आय.एम.एस सेवाग्रामचे डीन डॉ. नितीन गंगणे, पॅथॉलॉजी विभागातील प्राध्यापक व प्रमुख डॉ. अनुपमा गुप्ता, ब्लड बॅंकेचे प्राध्यापक व प्रभारी व्ही.बी. शिवकुमार उपस्थित होते.

क्लिक करा - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचवला कोविड नियंत्रणासाठी उपाय, वाचा काय म्हणाले ते...
रुग्णालयातून सुटी झाल्यावर २८ दिवसांच्या कालावधी नंतर कोविड आजारातून बरे झालेल्या व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यास पात्र आहेत. प्लाझ्मा दान करण्यासाठी सुमारे ४५-६० मिनिटे लागतात. कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. एमजीआयएमएस सेवाग्राम व कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये कोविड संसर्गाचे निदान व उपचारासाठी सर्व आवश्यक सुविधेसोबतच आता प्लाझ्मा उपचारही उपलब्ध आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top