esakal | भोंदूबाबाच्या नौटंकीचा झाला भंडाफोड, वाचा कसा? 
sakal

बोलून बातमी शोधा

Imposter exposed by ANIS

भेमडी येथे मोहाच्या झाडावर देव दिसल्याच्या चर्चेला उधाण आले होते. देव निघाल्याची बातमी तालुक्‍यात वाऱ्यासारखी पसरताच तालुक्‍यासह लगतच्या मध्य प्रदेशातील अनेक गावांमधील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती.

भोंदूबाबाच्या नौटंकीचा झाला भंडाफोड, वाचा कसा? 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वरुड (जि. अमरावती) : येथून जवळच असलेल्या मोठी भेंमडी येथे मोहाच्या झाडात देव दिसल्याच्या चर्चेला उधाण आले असताना आज (ता.3) अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भंडाफोड केला. अखेर कथित भोंदूबाबाने ठिकाणाहून पळ काढला. गेल्या महिनाभरापासून रवींद्र नामक व्यक्‍ती या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची अंधश्रद्धेतून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा. 

तालुक्‍यातील भेमडी येथे मोहाच्या झाडावर देव दिसल्याच्या चर्चेला उधाण आले होते. देव निघाल्याची बातमी तालुक्‍यात वाऱ्यासारखी पसरताच तालुक्‍यासह लगतच्या मध्य प्रदेशातील अनेक गावांमधील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. त्या मोहाच्या झाडाखाली देवी असल्याचे सांगून तेथे हार-फुले, नारळ, अगरबत्ती, प्रसाद विकणाऱ्यांनी दुकाने थाटली आहेत. 

तीन फेब्रुवारीपासून भेंमडी गावातील त्या मोहाच्या झाडाच्या परिसराला जत्रेचे स्वरूप आले. भेंमडी या आदिवासीबहुल गावात 25 वर्षीय युवकाला 2 फेब्रुवारी रोजी रात्री स्वप्न पडले. गावातील मोहाच्या झाडाखाली भगवान शंकर आणि माता पार्वतीचे वास्तव्य असल्याचा दृष्टांत त्याला स्वप्नातून झाला. तरुणाने ग्रामस्थांना तो सांगितला. तो युवक 3 फेब्रुवारी रोजी गावातील त्या मोहाच्या झाडाजवळ गेला. त्यावेळी ते झाड जमिनीकडे झुकल्याचा भास त्याला झाला. 

पाहता पाहता ही वार्ता वाऱ्यासारखी तालुक्‍यासह लगतच्या मध्यप्रदेशात सुद्धा पसरली. अनेक भाविकांनी भेंमडी गाव गाठायला सुरुवात करून पूजाअर्चा सुरू झाली. इतकेच नव्हेतर अनेक महिलांच्या अंगात देवी येत असल्याचे भाविक सांगतात. या झाडाला कवटाळले असता अनेक आजार बरे होतात, अशी श्रद्धा तेथे येणाऱ्या भाविकांमध्ये आहे. 

विवाहित महिलेला दाखवले चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष अन्‌ केले असे कृत्य...

प्रसारमाध्यमांनी ही बाब उघडकीस आणल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणी दाखल घेत अमरावती येथून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ऍड. गणेश हलकारे, जिल्हा संघटक शेखर पाटील, जिल्हा सचिव हरीश केदार, जिल्हा संघटक प्रकाश कळस्कर, तालुका संघटिका ऍड. प्रणिता चव्हाण, वरुड तालुकाध्यक्ष कमलाकर देशमुख, संघटक प्रदीप गणोरकर, तालुका महिलाध्यक्ष डॉ. मीना बंदे, सहसचिव किशोर पाटील, सुरेख खंडारे आदींनी भोंदूबाबाची भेट घेतली. 


प्रदीप गणोरकर यांना रुग्ण म्हणून भोंदूबाबासमोर पाठविण्यात आले. प्रदीप गणोरकर यांच्याबाबत नको ते सांगितल्यानंतर इतर रुग्णांना पाठविण्यात आले त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ऍड. गणेश हलकारे यांनी भोंदूबाबाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्याच्या खिशात किती रुपयाची नोट आणि त्यावरील क्रमांक दैवीशक्तीने सांगण्याचे आवाहन भोंदूबाबासमोर ठेवण्यात आले, त्यानंतर बराच वेळ होऊनही भोंदूबाबाला हे आवाहन पेलता आले नाही, अखेर ऍड.गणेश हलकारे यांनी उपस्थित भक्तांना हा भोंदूबाबा तुमची कशी फसवणुक करीत आहे, हे समजावुन सांगितले. 

loading image
go to top