"ग्रीन क्रूड अँड बायोफ्यूएल'च्या प्रसार व्हॅनचे लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

नागपूर ः बायोफ्यूअल निर्मितीतून शेतकरी, बेरोजगारांना रोजगार मिळेल. त्यामुळे बायोफ्यूएलचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. ग्रीन क्रूड अँड बायोफ्यूएल फाउंडेशनची प्रसार व्हॅन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्यात आत्मविश्‍वास वाढवेल, असा विश्‍वास केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

रामनगर येथील केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांच्या हस्ते ग्रीन क्रूड अँड बायोफ्यूएल फाउंडेशनच्या प्रसारव्हॅनचे लोकार्पण झाले. त्यांनी फाउंडेशनचे सचिव अजित पारसे यांच्याकडे या प्रसार व्हॅनच्या चाव्या सोपविल्या. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष व संशोधक डॉ. हेमंत जांभेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत जैवइंधन, इथेनॉलनिर्मितीतून शेतकऱ्यांना होणारा फायदा, थेट उद्योगाशी शेतकऱ्यांना जोडणे आदीवर त्यांनी चर्चा केली. कृषी मालाला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी नैराश्‍याने ते फेकून देतो. या कृषी मालाचा उपयोग इथेनॉल, जैवइंधन निर्मितीसाठी केल्यास देशातील शेतकरी समृद्ध होईल. त्या दिशेने ग्रीन क्रूड अँड बायोफ्यूएल फाउंडेशन कार्य करीत असल्याचे यावेळी अजित पारसे यांनी सांगितले. आज केवळ एक व्हॅनचे लोकार्पण झाले. मात्र, प्रत्येक गावांसाठी अशा बायोफ्यूएअल व ग्रीन क्रूडबाबत जनजागृतीसाठी व्हॅन उपलब्ध होईल. यातून शेतकऱ्यांना इंटरनेट, "इंडिया फॉर इथेनॉल' या "वेब पोर्टल'वर नोंदणीचे प्रशिक्षण देण्यात येईल. जैवइंधन काय आहे? कसे तयार करता येईल? त्यातून रोजगारनिर्मितीची क्षमता आदींबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही पारसे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of "Green crude and biofuel diffusion van."