कपिलनगर, पारडी, वाठोडा पोलिस ठाण्याचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

नागपूर ः सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला शासन प्राधान्य देत असून समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून नागरिकांच्या तक्रारींना जलद प्रतिसाद मिळावा, यासाठी पोलिस ठाण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी पोलिस ठाण्यांचे अंतर कमी करण्यात आले आहे. नवीन तीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

नागपूर ः सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला शासन प्राधान्य देत असून समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून नागरिकांच्या तक्रारींना जलद प्रतिसाद मिळावा, यासाठी पोलिस ठाण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी पोलिस ठाण्यांचे अंतर कमी करण्यात आले आहे. नवीन तीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

पोलिसांना देण्यात येणाऱ्या सुविधा, निवासस्थानांचे बांधकाम, पोलिस ठाण्यांच्या इमारतीची दुरुस्ती व अन्य कारणांसाठी आतापर्यंत शासनाने 900 कोटी रुपये नागपूर पोलिसांना दिले आहेत. आजपर्यंत पोलिस विभागाला एवढा निधी कधीच मिळाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हा निधी प्राप्त होऊ शकला. शहरातील उत्तर नागपुरात कपिलनगर, पूर्व नागपुरात पारडी व वाठोडा या तीन पोलिस ठाण्यांचे उद्‌घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार कृष्णा खोपडे, सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम, पोलिस उपायुक्त नीलोत्पल, सहायक पोलिस आयुक्त परशुराम कार्यकर्ते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मत्ते, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, पांडुरंग मेहर, पोलिस आयुक्त महावरकर, बाल्या बोरकर, नगरसेविका चेतना टांक, पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.
याप्रसंगी पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, जरीपटका पोलिस ठाण्यावर येणारा भार कमी करण्यासाठी कपिलनगर व कळमना पोलिस ठाण्यावरील भार कमी करण्यासाठी पारडी आणि वाठोडा अशा पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली. गेल्या पाच वर्षांच्या काळात गुन्ह्यांची संख्या कमी झाली. झोन 5 मध्ये पोलिसांची चांगली टीम लाभली आहे.
पोलिस आयुक्त कार्यालयाची आधुनिक इमारत होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे संपूर्ण शहरावर एकाच ठिकाणाहून नियंत्रण ठेवता येणार आहे. नागरिकांचे आणि नागरिकांच्या मालमत्तांचे रक्षण करणे शासनाचे कर्तव्य आहे. यासाठी पोलिस दल अधिक मजबूत आणि आवश्‍यक त्या सुविधांसह परिपूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या तीनही पोलिस ठाण्यांना आवश्‍यक तेवढे पोलिस कर्मचारी देण्यात आले आहेत. आमदार कृष्णा खोपडे आणि आमदार डॉ. मिलिंद माने यांचीही यावेळी भाषण झालीत. या दोन्ही आमदारांची आज उद्‌घाटन झालेल्या नवीन पोलिस ठाण्यांची मागणी होती. तीनही पोलिस ठाणेदारांनी आपापला पदभार स्वीकारला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of Kapilanagar, Pardi, Vathoda Police Station