गावाकडे जायला निघाले होते आजोबा, वाटेत घडले असे काही की...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

पोलिस आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत्यू झालेल्या व्यक्तीची कोणतीही आरोग्य तपासणी न करता त्याच्यावर घटनास्थळीच अंत्यसंस्कार करण्यात आले. या वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याच संशय आरोग्य विभागाला होता. यामुळे त्याची तपासणी होणे अपेक्षित होते. यावेळी मृतकासह असलेल्या व्यक्तीला आणि त्याची तपासणी करण्यात आलेल्या डॉक्टरला मात्र क्वारंटाइन करण्यात आले. 

कारंजा (घाडगे) : लॉकडाउनमुळे सर्वत्र रोजगाराची अडचण निर्माण झाल्याने हजारो कामगार वाहनाने स्वगृही जाण्यासाठी वाट धरत आहेत. एका ट्रकमधून मुंबई ते गोरखपूर (उत्तर प्रदेश) प्रवास करताना नागपू-अमरावती महार्गावर तालुक्यातील सारवाडी लगत प्रकृती खालावल्याने एका वृद्धाला उतरविण्यात आले. येथेच त्याचा मृत्यू झाला. 

घटनेची माहिती होताच पोलिस आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत्यू झालेल्या व्यक्तीची कोणतीही आरोग्य तपासणी न करता त्याच्यावर घटनास्थळीच अंत्यसंस्कार करण्यात आले. या वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याच संशय आरोग्य विभागाला होता. यामुळे त्याची तपासणी होणे अपेक्षित होते. यावेळी मृतकासह असलेल्या व्यक्तीला आणि त्याची तपासणी करण्यात आलेल्या डॉक्टरला मात्र क्वारंटाइन करण्यात आले. 

मुंबई येथून एका ट्रकमध्ये गोरखपूर येथे जात असलेल्या एका ८५ वर्षीय वृद्धाची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्याला वाहनातून अनुष्का हॉटेल समोर उतरविले. त्याच्या सोबत श्री. यादव (वय ५०) नामक व्यक्तीलाही उतरविण्यात आले. वृद्धाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याचा सायंकाळी मृत्यू झाला. मुंबई येथून आला असल्याने कोरोना संशयित लक्षणे असल्याचे सांगण्यात येत होते.  त्यामुळे या घटनेची माहिती पोलिस विभागाला देण्यात आली. त्यानंतर आरोग्य विभागाची चमू घटनास्थळी पोहोचली. 

मृताच्या आजूबाजूला निर्जंतुकीकरण करून आरोग्य विभागाने मृताासह सोबतच्या व्यक्तीची पाहणी केली. त्यानंतर श्री. यादव यांना सेवाग्राम येथे नेत त्यांचा घशाचे स्त्राव तपासणीसाठी  घेण्यात आला. मात्र, मृताचा कोणताही नमुना घेण्यात आला नाही.  रात्री उशिरा वरिष्ठांच्या आदेशाने त्याला तिथेच पोलिस विभागाकडून अग्नी देण्यात आला. 

मृताच्या अंत्यसंस्कार का केली घाई ? 
गोरखपूर येथे रहिवासी असलेला वृद्ध मुंबईकडून गावाला जात असताना अचानक प्रकृती बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना माहिती पडताच प्रशासनात खळबळ उडाली. मात्र, त्या वृद्धाचा घाईगडबडीत अंत्यसंस्कार केल्याने पोलिस प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहे.

"रेड झोन'बाबत मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी घेतली ही भूमिका..

 

मृत झालेल्या व्यक्तीची डॉक्टरने पाहणी केली. त्यानंतर त्याचा सोबत असलेला इसम त्याला रुग्णवाहिकेने वध्र्याला पाठविण्यात आले. या इसमाचा अहवाल येईपर्यंत तिथे गेलेल्या आरोग्य विभागाच्या चमुला क्वारंटाइन केले आहे.
- डॉ. सुरेश रंगारी
तालुका आरोग्य अधिकारी, कारंजा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: incident with old man while travelling to home