नगराध्यक्ष निवडणुकीतील पराभवानंतर वाढले आमदारांचे दौरे

संदीप रायपुरे
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

गोंडपिपरी (चंद्रपूर) : विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर गोंडपिपरी नगर पंचायत हातून जाणे आमदार संजय धोटे यांना जिव्हारी लागले आहे. यामुळे आता त्यांनी तालुक्यात दौरे वाढविले आहेत. कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याच्या सूचना देत ते नागरिकांशी संवाद साधू लागले. तर तरूणांनाही पक्षप्रवेश देण्यात येत आहेत.

गोंडपिपरी (चंद्रपूर) : विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर गोंडपिपरी नगर पंचायत हातून जाणे आमदार संजय धोटे यांना जिव्हारी लागले आहे. यामुळे आता त्यांनी तालुक्यात दौरे वाढविले आहेत. कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याच्या सूचना देत ते नागरिकांशी संवाद साधू लागले. तर तरूणांनाही पक्षप्रवेश देण्यात येत आहेत.

अडीच वर्ष गोंडपिपरीच्या नगरपंचायतीवर भाजपची सत्ता होती.मात्र काँग्रेस सेनेनी त्यांना सत्तेतून बाहेर केले. नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह आमदारांना हा मोठा धक्का मानला गेला. विधानसभा निवडणुकीत गोंडपिपरी तालूक्याने आमदार संजय धोटे यांच्या रूपाने भाजपला सर्वाधिक मताधिक्य देत विश्वास दाखविला.आमदारांनीही तालुक्याला दत्तक घेण्याचे आश्वासन दिले. पण तो पुरता फुसका बार ठरला.आता विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत,यामुळे मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी  आमदार स़ंजय धोटे जागे झाले आहेत.

या दृष्टीने गोंडपिपरी तालूक्यात आमदारांनी आपले दौरे वाढविले आहेत, परवाच सिमावर्ती भागात त्यांनी जनसंवाद कार्यक्रम घेतला. यानंतर गोंडपिपरीच्या विश्रामगृहात त्यांनी काही तरुणांना पक्षप्रवेश दिला.
सुनील गोहणे, सचिन झाडे, शुभम मेश्राम, पवन कनाके, अक्षय मेश्राम, रोहित मडावी, तरुण गाताडे, गौरव वासेकर या तरुणांना भाजजत प्रवेश देण्यात आला. भाजप तालुकाध्यक्ष बबन निकोडे, पं. स.सभापती दीपक सातपुते, वैष्णवी बोडलावार, उपसभापती मनीष वासमावार, सुरेश धोटे, संजय झाडे, गटनेते चेतन गौर, अमर बोडलावार, दीपक बोनगीरवार राकेश पुन, सिंधू पुणेकर, आदी कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती  होती.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एक मत जमवू न शकणाऱ्या भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले,यामुळे स्थानीक पदाधिकाऱयांसह आमदार संजय धोटे यांना हा पराभव जिव्हारी लागला आहे. याचे परिणाम विधानसभा निवडणुकीत होतील याची जाणीव आमदारांना आहे. त्यामुळे त्यांनी गोंडपिपरीकडे दौरे वाढविले आहेत.

Web Title: increase MLA visit after loosing election