दिलासा... पॉलिटेक्‍निक प्रवेश प्रक्रियेत वाढ

file photo
file photo

नागपूर  : दहावी, बारावीनंतर अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदाही उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्रक्रिया राबविण्यात आली. यंदाही प्रवेशाची परिस्थती तशी फारशी चांगली नसली तरी, प्रवेशात जवळपास 9 ते साडेनऊ टक्‍क्‍यांची वाढ दिसून आल्याने महाविद्यालयांना थोडाफार दिलासा मिळाला. प्रवेशात वाढ झाली असली तरी, एकूण जागांचा विचार केल्यास निम्म्या जागा रिक्त असल्याचे चित्र राज्यात दिसून येते.
राज्यात दहावीनंतर पॉलिटेक्‍निकमध्ये प्रवेशासाठी 378 महाविद्यालयांतील 1 लाख 8 हजार 41 जागा, थेट द्वितीय वर्षाच्या 387 संस्थांमध्ये 82 हजार 275 जागा तर बारावीनंतरच्या प्रवेशासाठी 398 महाविद्यालयांमध्ये 24 हजार 481 जागांचा समावेश होता. दहावीच्या निकालानंतर पॉलिटेक्‍निकच्या नोंदणीसाठी सुरुवात करण्यात आली. यामध्ये दहावीनंतर पदविका प्रवेश, थेट द्वितीय वर्ष प्रवेश आणि बारावीनंतर प्रवेश अशा तीन प्रकारांत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचे होते. 26 जूनपर्यंत प्रवेशास मुदतवाढ देण्याचा निर्णय विभागाने घेतला. त्यानंतरही जवळपास निम्मे अर्ज विभागाकडे प्राप्त झाले. झालेल्या नोंदणीच्या तुलनेत जागांचे प्रमाण कमी असल्याने यावर्षीही रिक्‍त जागांची संख्या अधिक राहण्याचे चित्र होते. त्यातच दहावीच्या निकालात कमालीची घट झाल्याने या अभ्यासक्रमात प्रवेशाची वानवा राहील असे चित्र होते. प्रवेश प्रक्रियेत दहावीनंतर पॉलिटेक्‍निकमध्ये 55 हजार 23, थेट द्वितीय वर्षात 35 हजार 581 तर बारावीनंतर 24 हजार 290 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. 2018-19 या वर्षाच्या तुलनेत दहावीनंतरच्या प्रवेशात 9.19 टक्के तर थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशात 9.83 टक्के वाढ झालेली आहे. ही वाढ होत असताना, तिन्ही प्रकारांत अनुक्रमे 49.07 टक्के, 56.75 टक्के आणि 0.78 टक्के जागा रिक्त आहेत हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com