तोतलाडोहमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

नागपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह जलाशयाची पाण्याची पातळी वाढली आहे. रविवारी, 12 टक्के जलसाठा असलेल्या या जलाशयात आज 18 टक्के पाण्याची नोंद करण्यात आली. जलाशयात पाण्याची पातळी वाढली असली तरी पुढील उन्हाळ्यातील नियोजनाच्या दृष्टीने शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरूच राहणार असल्याचे सूत्राने नमूद केले.

मध्य प्रदेशातील चौराई धरण तुडुंब भरल्याने काल, रविवारी सहा दरवाजे उघडले. त्यामुळे तोतलाडोह जलाशयात 85 दलघमी पाण्याची वाढ होणार असल्याचा दावा जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी केला होता. आज तोतलाडोह जलाशयाची पातळी वाढली. रविवारी सायंकाळपर्यंत 12 टक्के भरलेल्या जलाशयात आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत 18 टक्के पाण्याची नोंद करण्यात आल्याचे जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी सांगितले. चौराई धरणात मर्यादापेक्षा अधिक पाणीसाठा होत असल्यामुळे या धरणातून सतत पाणी सोडले जात आहे. त्याचा लाभ तोतलाडोह जलाशयाला होत आहे. मात्र, शहरात पाणीपुरवठ्यावर याचा कुठलाही परिणाम होणार नाही. महापालिकेने आधीच पुढील वर्षीच्या उन्हाळ्यातील पाण्याचे नियोजन आतापासून सुरू केले आहे. त्यामुळे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याचे सूत्राने नमूद केले. सप्टेंबरमध्येही मध्य प्रदेशात जोरदार पाऊस पडत असल्याने पुढील महिन्यातही चौराईतून तोतलाडोह जलाशयात पाणी येईल, अशी अपेक्षा जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके व्यक्त केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in water level in Toledo Doh