Vidhan Sabha 2019 अपक्ष उमेदवाराच्या प्रचारावरून गडचिरोलीत वादंग

File photo
File photo

आरमोरी (गडचिरोली) : आरमोरी व गडचिरोली या दोन विधानसभा क्षेत्रांत तीन अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराने प्रमुख पक्षाच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे त्या अपक्ष उमेदवारावर राजकीय दबावतंत्राचा वापर होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या दोन तर कॉंग्रेसच्या एका उमेदवाराने बंडखोरी करून निवडणूक मैदानात उतरून प्रचार आरंभला आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रचारापासून दूर राहण्यासाठी दबाव टाकला जात आहे.
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार आनंदराव गेडाम व त्यांचा मुलगा लॉरेन्स गेडामसह 10 जणांवर आरमोरी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपक्ष उमेदवार बग्गुजी केवलराम ताडाम आपल्या दोन साथीदारांसह देलनवाडी येथून नाटकाच्या उद्‌घाटनानंतर घरी दवंडी येथे परत येत असताना लॉरेन्स व त्याच्या साथीदारांनी पाठलाग करून वैरागड जवळील सुकाळा फाट्यावर मोटारसायकल अडवून बग्गुजी ताडाम व त्यांचे दोन सहकारी चरणदास किरंगे व अशोक उसेंडी यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला, असे ताडाम यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी आनंदराव गेडाम व त्यांचा मुलगा लॉरेन्स आनंदराव गेडाम यांच्यासह पंकज प्रभाकर तुलावी, जीवन पाटील नाट, जयंत हरडे, तितराम, स्वप्नील ताडाम आणि इतर दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

तिकीट न मिळाल्याने झाले शत्रू
बग्गुजी ताडाम आनंदराव गेडाम यांचे सहकारी होते. ते आरमोरी पंचायत समितीचे उपसभापतीसुद्धा राहिले आहेत. मात्र, काही कालावधीनंतर राजकीय मतभेद झाल्याने त्यांनी आनंदराव गेडाम यांची साथ सोडली. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसकडे तिकिटासाठी गळ घातली होती. मात्र, गेडाम यांना उमेदवारी मिळाल्याने ताडाम अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले. त्यांचा काही गावांमध्ये प्रभाव असल्याने धास्तावलेल्या गेडाम यांनी ताडाम यांच्यावर दबाव टाकण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com