esakal | इतर धर्म ग्रंथांप्रमाणेच भारताची राज्यघटना श्रेष्ठ - देशपांडे
sakal

बोलून बातमी शोधा

vidarbh

इतर धर्म ग्रंथांप्रमाणेच भारताची राज्यघटना श्रेष्ठ - देशपांडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिग्रस (जि. यवतमाळ) : भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या अनावरणाचा मान मला मिळाला. सर्वांना कळकळीची विनंती की ’संविधानाला हृदयात स्थान द्या.’ या देशात विविध जाती, धर्म व पंथांचे लोक राहतात. ते आपल्या धर्मग्रंथांना श्रेष्ठ मानतात. इतर धर्म ग्रंथांप्रमाणेच भारताची राज्यघटना हीदेखील श्रेष्ठ ग्रंथच आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ नागपूरचे न्यायमूर्ती तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालक न्यायाधीश व्ही. एम. देशपांडे यांनी केले. ते दिग्रस येथील दिवाणी न्यायालयात संविधान उद्देशिकेच्या अनावरणप्रसंगी बोलत होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना प्रदान केलेल्या भारतीय राज्यघटनेचा गाभा म्हणजेच घटनेचा सारांश असलेल्या प्रस्तावना फलकाचे अनावरण शनिवारी (ता. 11) येथील दिवाणी न्यायालयाच्या परिसरात करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ नागपूरचे न्यायमूर्ती देशपांडे होते. त्यांच्या हस्ते संविधान उद्देशिका फलकाचे अनावरण झाले.

हेही वाचा: बुलडाणा : बापाचा खून करणाऱ्या मुलीस न्यायालयीन कोठडी

कार्यक्रमाला जिल्ह्याचे प्रधान जिल्हा व संघ न्यायाधीश व्ही. पी. पाटकर, दिग्रस दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एस. एल. रामटेके व एन. आर. ढोके, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अ‍ॅड. आशिष देशमुख यांची विशेष उपस्थित होती. कार्यक्रमासाठी दिग्रस तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. फरहाद वर्षाणी, अ‍ॅड. गणेश दुधे, अजय पवार, गिरीश दळवी, सागर गावंडे आदींसह वकील संघांचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी पुढाकर घेतला. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ सुखदेव हटकर, अ‍ॅड सुनील व्यवहारे, साजिद वर्षाणी यांच्यासह दिग्रस, आर्णी, पुसद व दारव्हा येथील वकील संघाचे पदाधिकारी उपस्थिती होते.

loading image
go to top