esakal | क्या बात है! हॉलिडे बनले 'सायन्स डे'; आयसरचे सोपे विज्ञान प्रयोग पोहोचले सातासमुद्रापार
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Institute of Science Education and Research teaching students daily

विज्ञान प्रेमींसाठी शनिवार रविवारच्या विज्ञान कार्यशाळा मेजवानी ठरत असून हॉलिडेचे रूपांतर "सायन्स' फनडे मध्ये झाले आहे. एससीईआरटी (विद्या परिषद ) पुणे गेल्या सहा महिन्यापासून शाळा बंद, शिक्षण सुरू मालिका चालवीत आहे.

क्या बात है! हॉलिडे बनले 'सायन्स डे'; आयसरचे सोपे विज्ञान प्रयोग पोहोचले सातासमुद्रापार

sakal_logo
By
श्रीनाथ वानखडे

मांजरखेड (जि. अमरावती) ः कोविडचा काळ काहींसाठी अत्यंत क्‍लेशदायक ठरत असला तरी अनेक विद्यार्थ्यांसाठी तो उज्वल भविष्यातील नांदी ठरणार आहे. याच काळात भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयसर) पुणे येथील प्राध्यापक व शास्त्रज्ञांनी अथक परिश्रम घेऊन अभ्यासक्रमातील क्‍लिष्ट विज्ञान प्रयोग सुलभ करून राज्यासह देशविदेशात पोचविले. 

विज्ञान प्रेमींसाठी शनिवार रविवारच्या विज्ञान कार्यशाळा मेजवानी ठरत असून हॉलिडेचे रूपांतर "सायन्स' फनडे मध्ये झाले आहे. एससीईआरटी (विद्या परिषद ) पुणे गेल्या सहा महिन्यापासून शाळा बंद, शिक्षण सुरू मालिका चालवीत आहे.

क्लिक करा - मोबाईलवर लिंक पाठवल्यानंतर आला फोन; माहिती भरल्यानंतर तरुणी लागली रडायला

शाळा बंद असताना विद्यार्थ्याची क्रियाशीलता कायम राहावी म्हणून आयसर संस्थेच्या सहकार्यातून दर शनिवारी सकाळी 11 वाजता "मैत्री करुया विज्ञान गणिताशी' ही ऑनलाइन मालिका सुरू आहे. यातील केवळ तीन मालिका सुमारे अडीच लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक व विज्ञानप्रेमींनी बघितल्या असून यातील दाखविलेले प्रयोग आता घरोघरी केल्या जात आहेत.

आयसरद्वारा शनिवारी सायंकाळी 4 वाजता भारतातील नामवंत विज्ञान तज्ञांचे "एज्युकेटर वेबिनार', रविवारी सकाळी 11 वाजता देशभरातील इयत्ता 5 वी ते 12 च्या विद्यार्थी व शिक्षकांसाठी हिंदी व इंग्रजी भाषेत "नेक्‍स्ट जनरेशन सायन्स कॅम्प - एक्‍प्लोरिंग फन ऍक्‍टिव्हिटी ऍट युवर डोअरस्टेप' हा उपक्रम सुरू आहे. यासोबत दुपारी अडीच वाजता आयआयटी गांधीनगरच्या सहकार्यातून घरगुती साहित्याच्या माध्यमातून कृतीयुक्त विज्ञान गणित मालिका दाखविल्या जातात. 

हे सर्व उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोचावे याकरिता शिक्षण आयुक्त विशाल सोळंके, एससीईआरटीचे संचालक दिनकर पाटील, उपसंचालक विकास गरड तसेच आयसर मधील अधिष्ठाता प्रा. संजीव गलांडे, डॉ. हरिनाथ चक्रपाणी, डॉ. सौरभ दुबे आदींची भूमिका मोलाची आहे.

सविस्तर वाचा -  Video गावाचा सुपुत्र निघाला आर्मीत; गावकऱ्यांनी दिला आगळावेगळा निरोप

प्रयोगातून संधीचे सोने

आयसरद्वारा सुरू असलेल्या मालिकांद्वारा केवळ पाच महिन्यात 11 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचलो. जगातील 10 पेक्षा अधिक देशात हे प्रयोग नियमितपणे बघितल्या जात आहेत. विज्ञान प्रयोग सातासमुद्रपार पोचले हे कोविड काळातील संधीचे सोनेच म्हणावे लागेल, असे सायन्स एक्‍टिव्हीटी सेंटर आयसरचे प्रोग्राम मॅनेजर अशोक रुपनेर यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top