मोबाईलवर लिंक पाठवल्यानंतर आला फोन; माहिती भरल्यानंतर तरुणी लागली रडायला

अनिल कांबळे
Friday, 23 October 2020

जस ॲकेडमी ऑफ मॅथेमॅटिक्सच्या संचालिकेची विद्यार्थ्याने अफरातफर करीत ४० हजारांनी फसवणूक केली. या प्रकरणात विजय कुलकर्णी (३०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता प्रवीण जाधव (४३, रा. सोमलवाडा चौक, वर्धा रोड) असे फिर्यादीचे नाव आहे.

नागपूर : सीम कार्ड बंद होणार असल्याची बतावणी करून सायबर गुन्हेगारांनी एका तरुणीची फसवणूक केली. खात्याशी संबंधित माहिती जाणून घेत एक लाख आठ हजार ६८२ रुपयांचा चुना लावला. याप्रकरणी पोलिसांनी २६ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींवर आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही एका खासगी कंपनीत कामाला आहे. १२ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजताच्या सुमारास पीडितेच्या मोबाईलवर कस्टमर केअर नंबरवरून एक संदेश आला. त्यात लिहिले होते की, तुमचा सीम कार्ड बंद होणार आहे. सीम सुरू ठेवण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. तरुणीने लिंकवर क्लिक करताच मोबाईलमध्ये पबा क्विक स्पोर्टस टीम व्हीवर नावाचे अप्लिकेशन डाऊनलोड झाले.

अधिक वाचा - ब्रेकिंग : यशोमती ठाकूर यांना हायकोर्टाचा दिलासा; तीन महिन्यांच्या शिक्षेला दिली स्थगिती

यानंतर आरोपीने पीडितेला फोन करून खात्याशी संबंधित माहिती त्यात भरायला लावली. आरोपीने सांगितल्याप्रमाणे पीडितेने आपल्या आंध्रा बँक खात्याची माहिती ॲपमध्ये भरली. या माहितीचा उपयोग करून आरोपीने पीडितेच्या खात्यातून एक लाख रुपये स्वताच्या खात्यात स्थानांतरित केले. पोलिसांनी आयटी ॲक्टसह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

तसेच दुसऱ्या घटनेत मित्राला गुगल-पेवर पैसे पाठविल्यानंतर पैसे खात्यातून वजा झाले. परंतु, ती रक्कम संबंधित व्यक्तीला मिळाली नाही. त्याबाबत वेबसाइटवरील क्रमांकावर विचारणा केली असता त्याने बँक खात्याची माहिती विचारून ५० हजारांनी फसवणूक केली. ही घटना शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

सविस्तर वाचा - अर्ध्यारात्री बोलावले तरी यावेच लागेल!, श्रीमुखात लगावली

प्राप्त माहितीनुसार, शांतीनगर भागात राहणारे ५० वर्षीय फिर्यादी यांनी आपल्या मित्राला १२ हजार रुपये गुगल-पेच्या माध्यमातून पाठविले. मात्र, ते पैसे मित्राच्या खात्यात जमा झाले नाही. त्यांनी संबंधित आरोपी व्यक्तीस पैसे जमा झाले नसल्याची विचारणा केली. आरोपी ठगबाजाने पुन्हा फिर्यादीला बँक खात्याची माहिती तसेच ओटीपी नंबर विचारला. आरोपीने दोनदा २५ हजार रुपये असे एकूण ५० हजार रुपयांची रक्कम फिर्यादीच्या खात्यातून ऑनलाईन काढून परस्पर आपल्या खात्यात वळते केले. खात्यातून ५० हजार रुपयांची रक्कम काढण्यात आल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

तिसऱ्या घटनेत ओजस ॲकेडमी ऑफ मॅथेमॅटिक्सच्या संचालिकेची विद्यार्थ्याने अफरातफर करीत ४० हजारांनी फसवणूक केली. या प्रकरणात विजय कुलकर्णी (३०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता प्रवीण जाधव (४३, रा. सोमलवाडा चौक, वर्धा रोड) असे फिर्यादीचे नाव आहे. आरोपी विजय कुलकर्णी हा शिक्षणासाठी १० वर्षांपासून कविता यांच्याकडे राहत होता.

जाणून घ्या - सर्तक रहा, आणखी पाऊस येणार म्हणजे येणार!

यादरम्यान त्याने त्यांचा विश्वास संपादन केला. यादरम्यान ॲकेडमीच्या भाड्याचे २५ हजार, ॲकेडमीच्या झेरॉक्स नोटचे १० हजार, विद्यार्थ्यांच्या शुल्काचे ५ हजार असे एकूण ४० हजार रुपये परस्पर लाटले. शिवाय आईच्या उपचारासाठी त्याने संचालिकेकडे पैशाची मागणी केली. त्यांनी देण्यास नकार दिला असता शिवीगाळ करून कविता यांच्या संस्थेचे मूळ कागदपत्राची ब्ल्यू प्रिंट, घडी व मुलांचे साहित्य जाळून टाकण्याची धमकी दिली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online fraud of three in the Nagpur city