esakal | गोंडवाना वनवृत्तनिर्मिती धोरणाला का होतोय विरोध?
sakal

बोलून बातमी शोधा

indian rangers association opposes to gondwana forestry

महाराष्ट्रात सर्वांत जास्त जैवविविधता जिल्ह्याच्या वनात आहे. त्यामुळे चंद्रपूर येथे वनवृत्त  कार्यालयाची नितांत आवश्‍यकता आहे. त्यातच गडचिरोली आणि चंद्रपूर वनवृत्त एकत्र केल्यास कर्मचाऱ्यांच्या आस्थापनेबाबत मोठा गंभीर प्रश्‍न निर्माण होणार आहे.

गोंडवाना वनवृत्तनिर्मिती धोरणाला का होतोय विरोध?

sakal_logo
By
श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर : चंद्रपूर व गडचिरोली वनवृत एकत्र करून गोंडवाना वनवृत्ताची निर्मिती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या धोरणाविरोधात शुक्रवारी (ता. 4) मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर वनवृत कार्यालयात बैठक घेण्यात आली.  

हेही वाचा - पोलिसांची सोशल मीडियावर खदखद : साप्ताहिक सुट्यांचा ‘वांदा’; गृहमंत्रालयाच्या आदेशाला...

अखिल भारतीय रेंजर्स असोसिएशनचे सचिव अरुण तिखे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश गंटावार, सहसचिव संजय मैद, वनरक्षक वनपाल संघटनेचे केंद्रीय संघटक राजेश पिंपळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. इको-प्रो चे संस्थापक  बंडू धोतरे यांची विशेष उपस्थिती होती. चंद्रपूर वनवृत्तात मानव व वन्यजीव संघर्ष तीव्र स्वरूपाचा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघाची संख्या खूप मोठी आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या बाहेरसुद्धा ताडोबा एवढेच वाघाची संख्या आहे.

हेही वाचा - डॉ. शीतल आमटे मृत्यूप्रकरण : डावखुऱ्या नसतानाही उजव्या हाताला इंजेक्‍शन कसे टोचले?

महाराष्ट्रात सर्वांत जास्त जैवविविधता जिल्ह्याच्या वनात आहे. त्यामुळे चंद्रपूर येथे वनवृत्त  कार्यालयाची नितांत आवश्‍यकता आहे. त्यातच गडचिरोली आणि चंद्रपूर वनवृत्त एकत्र केल्यास कर्मचाऱ्यांच्या आस्थापनेबाबत मोठा गंभीर प्रश्‍न निर्माण होणार आहे. 2010 मध्ये उत्तर व दक्षिण वनवृत्ताची फाळणी करून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हानिहाय वनवृत्त निर्माण करण्यात आले. त्यामुळे सेवाज्येष्ठतेचा प्रश्न निर्माण झाला होता. तो अजूनपर्यंत पूर्णपणे सुटलेला  नाही. संचालन संतोष अतकारे यांनी, तर  आभार मुंगेलवार यांनी मानले. 
 

loading image
go to top