
आनंदवनातील संपर्कातील लोकांचे बयाण घेतले. मात्र, त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे शोधण्यात पोलिसांचा वेळ जात आहे. डॉ. शीतल आमटे या मानसिक तणावात होत्या. ही बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली असली तरी आत्महत्या की हत्या हे गूढ कायम आहे. हाय प्रोफाइल प्रकरण असल्याने पोलिसही कमालीची गुप्तता पाडून आहेत.
आनंदवन (जि. चंद्रपूर) : महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूला सहा दिवसांचा कालावधी लोटला. या कालावधीत पोलिसांनी आनंदवनातील दहा-बारा लोकांचे बयाण घेतले. करजगी कुटुंबीयांचेही बयाण घेण्यात आले. मात्र, अजूनही पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानंतर तपासाची दिशा ठरेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी ३० नोव्हेंबर रोजी आनंदवनातील राहत्या घरी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली होती. हे प्रकरण हाय प्रोफाईल असल्याने पोलिस प्रशासन कमालीची गुप्तता पाळून आहे.
सुरुवातीला पोलिसांनी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या खोलीतून मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज, औषधांचा साठा ताब्यात घेतला. या वस्तू नागपूर येथून पुणे येथील फॉरेस्निक लॅब येथे पाठविण्यात आल्या आहेत. त्याचा अद्याप अहवाल यायचा आहे.
डॉ. शीतल या डावखुऱ्या नसतानाही त्यांच्या उजव्या हाताला इंजेक्शनची खूण आहे. त्यामुळे ती आत्महत्या की हत्या याचा पेच पोलिसांसमोर आहे.
डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूला सहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. पोलिसांनी त्या वापरत असलेले लॅपटॉप, टॅब, मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज, इंजेक्शन, औषधी ताब्यात घेतली.
आनंदवनातील संपर्कातील लोकांचे बयाण घेतले. मात्र, त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे शोधण्यात पोलिसांचा वेळ जात आहे. डॉ. शीतल आमटे या मानसिक तणावात होत्या. ही बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली असली तरी आत्महत्या की हत्या हे गूढ कायम आहे. हाय प्रोफाइल प्रकरण असल्याने पोलिसही कमालीची गुप्तता पाडून आहेत.
हेही वाचा - बंगल्यामागे आढळली मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप
डॉ. शीतल ही वडील विकास आमटे यांची खूप लाडकी होती. काही दिवसांपूर्वीच आमटे कुटुंबीय हेमलकसा येते गेले होते. मुलगी मानसिक तणावात असल्याने तिची चिंता विकास आमटे यांना होती. ती शस्त्र परवाना घेऊन स्वतःचे काहीतरी बरेवाईट करेल अशी भीती त्यांना असावी. त्यामुळे डॉ. विकास आमटे यांनी भामरागड पोलिसांना पत्र देऊन डॉ. शीतल आमटे यांना कोणताही शस्त्र परवाना देऊ नये, अशी विनंती केली होती. सदर पत्र भामरागड येथून एक पोलिस कर्मचारी घेऊन २८ नोव्हेंबर रोजी वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात पोहोचला होता.
संपादन - नीलेश डाखोरे