esakal | कोण रूपाली चाकणकर? मी फक्त शरद पवार व अजित पवारांना ओळखते
sakal

बोलून बातमी शोधा

navneet rana

कोण रूपाली चाकणकर? मी फक्त शरद पवार व अजित पवारांना ओळखते

sakal_logo
By
अरुण जोशी

अमरावती : काही दिवसांपूर्वी जात पडताळणीमुळे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. त्यांची खासदारकी जाणार की काय? सर्वत्र चर्चा सुरू होती. मात्र, त्यांना सर्वोच न्यायालयातून तात्पुरता दिलासा मिळाला. दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी राजदंड चोरला होता. यामुळे भाजपचे १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. यामुळे ‘बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले’ असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर (NCP State President Rupali Chakankar) यांनी केले होते. याला उत्तर देताना खासदार नवनीत राणा यांनी मी रूपाली चाकणकर यांना ओळखत नाही. मी शरद पवार व अजित पवार यांना ओळखते, असे उत्तर दिले आहे. (Navneet-Rana-replied-to-Rupali-Chakankar)

दोन दिवसांपूर्वी पार पडलेले अधिवेशन चांगलेच चर्चेत राहिले. भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्याने आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्षाने अधिवेशनावर बहिष्कारसुद्धा टाकला. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या गोंधळाला गैर ठरवले. हाच मुद्दा धरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी एक ट्विट केले. ट्विटमध्ये त्यांनी ‘बायको जात चोरते आणि नवरा राजदंड. हे तर बंटी-बबली निघाले’ असे म्हटले आहे. या ट्विटद्वारे त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार रवी राणा आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली होती.

हेही वाचा: बापरे! कर्जासाठी बॅंक व्यवस्थापकाकडून शरीरसुखाची मागणी

या ट्विटला खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीत टोला लगावला. ‘मी रूपाली चाकणकर यांना ओळखत नाही. मी शरद पवार व अजित पवार यांना ओळखतो. जर ओळखीच्या व्यक्तींनी काही म्हटले तर त्याच उत्तर देईल. मी या दोघांची रिस्पेक्ट करते. त्यांनी काही म्हटलं तर काही चुकत असेल तर नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेल. ज्यांना मी ओळखत नाही त्यांच्या बद्दल बोलू शकत नाही’ असे बोलून नवनीत राणा यांनी रूपाली चाकणकर यांना उत्तर दिले.

नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना त्यांच्या पक्षातील लोकांना जागा दिली. मी अपक्ष खासदार आहे. तसेही मला फक्त दोनच वर्षे झालेली आहे. मोदी साहेबांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. मला अजून खूप शिकायचे आहे. विश्वास संपादन करायचा आहे. समोर काहीही होऊ शकते.
- नवनीत राणा, खासदार

हेही वाचा: १२ वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराने लग्न करताच प्रेयसीची आत्महत्या

मी मोठी नेता नाही

महाराष्ट्रातील चारही मंत्र्यांना माझी शुभेच्छा आहे. भारती पवार यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहे. महिलांनी महिलांचा आदर केला पाहिजे. संजय धोत्रे यांचे पद काढलेले नाही, असे मला वाटते. त्यांची प्रकृती चांगली नसल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असावा. मी एवढी मोठी नेता नाही. यावर भाष्य करू शकत नाही, असेही नवनीत राणा म्हणाल्या.

(Navneet-Rana-replied-to-Rupali-Chakankar)

loading image