esakal | ‘त्यांना़'`झाला संसर्ग आणि पशुपालक झाले हवालदिल
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

हा आजार विषाणुजन्य असल्याने एका जनावरापासून दुसऱ्याला लगेच होतो. त्यामुळे पशुपालक चिंचेत आहे.

‘त्यांना़'`झाला संसर्ग आणि पशुपालक झाले हवालदिल

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : जिल्ह्यात पशुधनावर लंपी स्कीन डीसीस या त्वचेशी संबंधित आजाराचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. त्यामुळे पशुपालक हवालदिल झाले आहेत. हा आजार विषाणुजन्य असल्याने एका जनावरापासून दुसऱ्याला लगेच होतो. त्यामुळे पशुपालक चिंचेत आहे.

विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यापाठोपाठ आता अमरावती जिल्ह्यातसुद्धा जनावरांवर लंपी स्कीन डीसीसचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. मोर्शी, वरुड या तालुक्‍यातील काही गावांमध्ये आतापर्यंत २० ते २५ जनावरांना या आजाराची लागण झाल्याची माहिती आहे. सध्या जिल्ह्यात या आजाराचा प्रादुर्भाव फारसा झालेला नसला तरी जनावरांमध्ये त्याचा संसर्ग होण्याची शक्‍यता अधिक आहे. या आजाराने बाधित झालेल्या जनावराचे डोके, मान, पोट, पाय तसेच शेपटीखाली गाठी येतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास जनावर दगावूसुद्धा शकते. विशेष म्हणजे या आजारावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. विशेष बाब म्हणजे पशुसंवर्धन विभाग अद्यापही निद्रिस्त असल्याचा पशुपालकांचा आरोप आहे.

वाचा - या महिलांच्या जिद्दीला सलाम...मुरखळा माल येथील दारूविक्रेत्याच्या आवळल्या मुसक्या...वाचा सविस्तर

बाहेरील जनावरांपासून फैलाव
मागील १५ दिवसांपासून लंपी स्कीन डीसीस या आजाराचा प्रादुर्भाव जनावरांवर होताना दिसतोय. बाहेरगावावरून विक्रीसाठी आणण्यात येणाऱ्या जनावरांपासून या आजाराचा फैलाव होतो. त्यामुळे पुढील काही दिवस तरी जनावरांच्या वाहतुकीवर पूर्णपणे प्रतिबंध करण्याची गरज असून जनावरांवर वेळीच औषधोपचार केला जावा, अशी मागणी पशुपालक रवी पाटील यांनी केली.

जनावरांवर लंपी स्कीन डीसीजचा संसर्ग आहे, ही बाब खरी आहे. मात्र औषधोपचारानंतर दोन ते तीन दिवसांत हा आजार पूर्णपणे बरा होतो. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत १० ते १५ जनावरांवर हा संसर्ग दिसून आला आहे. आम्ही शासनाकडे गोट कॉकल वॅक्‌सीनची मागणी केली असून ती लवकरच मिळणार आहे.
डॉ. विजय रहाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद.
 

संपादन - नरेश शेळके

loading image
go to top