esakal | ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती; महिला आयोगाची विभागीय कार्यालये महिलादिनी होणार कार्यान्वित
sakal

बोलून बातमी शोधा

Information of Yashomati Thakur The divisional offices of the Womens Commission will be operational on Womens Day

विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्त कार्यालयात महिला आयोगाची कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. त्यासाठी महिला व बालविकास विभागात सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचे साहाय्य घेण्यात येत आहे.

ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती; महिला आयोगाची विभागीय कार्यालये महिलादिनी होणार कार्यान्वित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची सहा विभागस्तरीय कार्यालये जागतिक महिला दिनी म्हणजे आठ मार्च रोजी कार्यान्वित होत आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली. ही कार्यालये महिला व बालविकास विभागीय उपायुक्त कार्यालयात सुरू होत आहेत.

अत्याचार पीडित महिलांना जलदगतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी यासाठी राज्य महिला आयोगाची कार्यालये सर्व विभागीय आयुक्तालय, मुख्यालयांच्या ठिकाणी सुरू व्हावीत, अशी संकल्पना यशोमती ठाकूर यांनी मांडली होती. त्यानुसार नुकताच शासननिर्णय जारी करण्यात आला होता. पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि कोकण विभागस्तरावर ही कार्यालये महिलादिनी एकाच दिवशी प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यात येत आहेत.

अधिक वाचा - भाजपसाठी धोक्याची घंटा! सर्वेक्षणातून समोर आला धक्कादायक निष्कर्ष; नेत्यांची चिंता वाढली

मुंबई हे राज्याचे मध्यवर्ती ठिकाण नसल्यामुळे अत्याचारपीडित महिलांना महिला आयोगाकडे दाद मागायची असेल तर सुलभ संपर्क साधणे कठीण जात होते. तथापि, आता विभागीय कार्यालये सुरू होत असल्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्त कार्यालयात महिला आयोगाची कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. त्यासाठी महिला व बालविकास विभागात सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचे साहाय्य घेण्यात येत आहे.

विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास यांना राज्य महिला आयोगाचे सदस्य सचिव यांच्या समन्वयाने या कार्यालयांचे कामकाज हाताळावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. या विभागीय कार्यालयांच्या परिक्षेत्रातील समस्या घेऊन आलेल्या महिलांच्या समस्यांचे तातडीने निवारण व्हावे, यासाठी महिलेच्या इच्छेनुसार तज्ज्ञ समूपदेशकाकडून समूपदेशन केले जाईल किंवा स्थानिक पोलिस ठाण्यातून साहाय्य उपलब्ध करून दिले जाईल.

जाणून घ्या - "आई तुझा प्रॉब्लेम काय आहे?" असं विचारत अवघ्या १६ वर्षांच्या मुलीनं घेतला गळफास; हृदयद्रावक घटना

अतिमहत्त्वाच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी किंवा आयोगाने स्वाधिकारे (सु-मोटो) दखल घेण्यासारख्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याने कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.

loading image