धान्य वाहनाची केली तपासणी; आढळून आले भलतेच काही

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

सोमवारी पकडलेला अवैध गुटखा हा चिखली येथील निसार हाजी यांचा असल्याचे वाहन चालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे. जिल्ह्यातला मुख्य गुटखा किंग म्हणून चिखली येथील निसार हाजी याचे नाव प्रसिद्ध आहे. या अगोदरही पोलिसांनी अनेकवेळा हाजी यांचा अवैध गुटखा पकडून कारवाई केली आहे.

खामगाव (जि. बुलडाणा) : लॉकडाउन असताना धान्याची वाहतूक म्हणून चक्क गुटख्यी वाहतूक होत असल्यची माहिती मिळाल्याने सोमवारी सकाळीच पाच वाजताच्या दरम्यान एसडीपीओ पथकाने सापडा रचून वाहनाची तपासणी केली असता लाखो रुपयाचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. यामध्ये वाहन चालकासह एकूण 17 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

क्लिक करा- अमर रहे अमर रहे...साश्रुनयनांनी वीरपुत्रास दिला निरोप

सकाळी पाच वाजता केली कारवाई
लॉकडाउन दरम्यान धान्य वाहतुकीच्या आड सुरू असलेल्या गुटखा तस्करीचा एसडीपीओ पथकाने भांडा फोड केला. येथील अकोला बायपासवर मेटॅडोरसह तब्बल 17 लाखाचा मुद्देमाल पकडला आहे. धान्य घेऊन जाणारा मेटॅडोर क्र. एम.एच. 28 ए.आर. 5599 मध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती एसडीपीओ पथकाला मिळाली. यावरून सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास अकोला-बाळापूर रोडवरील छोटा हनुमान मंदिराजवळ पोलिसांनी सदर वाहन थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये मका धान्याच्या पोत्यांच्या आड मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा मिळून आला.

हेही वाचा- वडिलांचा होता अत्यंसंस्कार मात्र, लॉकडाउनमुळे जाणे शक्य नव्हते म्हणून त्याने...

या व्यक्तीचा अनेकवेळा केला माल जप्त
यावेळी मेटॅडोर चालक शेख आबीद शेख हसन (वय 33) रा. चिखली यास अटक करून मेटॅडोरसह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई एसडीपीओ प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोकाँ सुधाकर थोरात, देवेंद्र शेळके, प्रदीप मोठे, पोकॉ. रवींद्र कन्नर यांनी केली. सोमवारी पकडलेला अवैध गुटखा हा चिखली येथील निसार हाजी यांचा असल्याचे वाहन चालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे. जिल्ह्यातला मुख्य गुटखा किंग म्हणून चिखली येथील निसार हाजी याचे नाव प्रसिद्ध आहे. या अगोदरही पोलिसांनी अनेकवेळा हाजी यांचा अवैध गुटखा पकडून कारवाई केली आहे. अकोला, बुलडाणा आणि जालना जिल्ह्यात अवैध गुटख्याची तस्करी चिखली शहरातून केल्या जाते. याकडे अन्न व औषध विभागाने आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspection of grain transport; Something has been discovered