esakal | प्रेरणादाई! ग्रामीण भागाच्या विकासाचे ध्येय
sakal

बोलून बातमी शोधा

लोकसहभागातून सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तयार केलेले गोटूल.

प्रेरणादाई! ग्रामीण भागाच्या विकासाचे ध्येय

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : अमरावती येथून अभियंत्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे, मुंबई व गुजरात येथे नोकरी केली. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक म्हणून निवड झाली. गडचिरोली जिल्ह्यात जायचे असल्याने प्रारंभी थोडी भीती वाटत होती. परंतु, "कर कें देखेंगे' असे ठरवत रुजू झालो. काही दिवसांतच येथे नागरिकांच्या सहभागातून आठवडी बाजार व महिला बचतगटामार्फेत मशरूमचा व्यवसाय सुरू केला, लोकसहभागातून गोटूल बांधल्याचे शुभम सांगत होता.
शुभम राऊत (25, रा. कामठी) मूळचा ग्रामीण भागातील रहिवासी असल्यामुळे गावातील समस्यांची चांगल्याप्रकारे जाणीव आहे. सरकारी योजनांची माहिती तळागळापर्यंत पोहोचत नसल्याने ग्रामीण नागरिक विकासापासून कोसो दूर राहतो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासासाठी ग्रामपरिवर्तक झालो, असे शुभम अभिमानाने सांगतो. तो म्हणाला, येथील जंगलांत भ्रमंती केल्यानंतर जंगल असताना गरिबी का, असा प्रश्‍न पडला. जंगलाचा व नागरिकांचा अभ्यास करायचा असल्यामुळे सीएफआर (सामूहिक वनपट्टा) मिळालेले गाव पाहिजे होते. त्यामुळे काही दिवसांनी ग्रामपंचायत वडसा (खुर्द) स्वत: मागून घेतले. यांतनर मोरावाही गावात ग्रामसभा सक्षम करण्यासाठी मदत केली. गावातील समस्या गावातीलच लोकांनी सोडवाव्या व स्वत:चा विकास करावा यासाठी प्रयत्न करीत आहे.
गाव हे विकासाचे मॉडेल बनावे या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. गावकऱ्यांचे शहरात होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देत आहे.
-शुभम राऊत, ग्रामपरिवर्तक, गडचिरोली.

loading image
go to top