अनिल तंबाखे यांना अंतरिम जामीन

अनिल तंबाखे यांना अंतरिम जामीन

खापरखेडा (जि. नागपूर) : सिल्लेवाडा येथील स्टार बस उद्‌घाटन सोहळ्यात चांगलाच वाद निर्माण झाला. यानंतर अनिल तंबाखे यांनी निषेध सभा घेऊन सरपंच प्रमिला बागडे यांच्याबद्दल अश्‍लील भाषेत संभाषण केले. यामुळे तंबाखे यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, 18 सप्टेंबरला तंबाखे यांनी न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मिळविला आहे.
12 सप्टेंबरला नागपूर ते सिल्लेवाडा स्टार बस सुरू करण्यात आली. मात्र, उद्‌घाटन सोहळ्यात चांगलाच वाद झाला. भाजपने दुसऱ्याच दिवशी झेंडा लावा आंदोलन करीत निषेध सभा घेतली. मात्र, लाल चौक सिल्लेवाडा येथील निषेध सभेत भाजपचे ग्रामपंचायत सदस्य अनिल तंबाखे यांनी सरपंच प्रमिला बागडे यांना अश्‍लील भाषेत संभाषण करून अपमानित केले. यामुळे हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. खापरखेडा पोलिसांनी सरपंच प्रमिला बागडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला. मात्र, तक्रार देऊनही तंबाखे यांना अटक न केल्याने संतप्त सरपंच, समर्थक व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला आणि अटक करण्याची मागणी रेटून धरली. आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्वात 17 सप्टेंबरला आंदोलन करून खापरखेडा रेल्वे चौकी येथे निषेध सभा घेण्यात आली. बुधवारी अनिल तंबाखे यांनी न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मिळविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com