राष्ट्रवादी’तील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

‘त्या’फलकाने वेधले लक्ष;राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक
hording
hordingsakal

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार विभागीय आढावा घेण्यासाठी अमरावती येथे येत आहे. त्या अनुषंगाने रविवार (ता.तीन) जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी स्थानिक साईसत्य ज्योत मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या ठिकाणी ‘जिल्हाध्यक्ष हटाव,राष्ट्रवादी बचाव’फलक झळकले. त्यामुळे पक्षातील अतंर्गतकलह चव्हाट्यावर आला आहे.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. यासाठी पक्षसंघटन बळकट करण्यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार पुढील आठवड्यात अमरावती येथे येणार आहे. याठिकाणी ते अमरावती विभागातील पक्षाचा आढावा घेणार आहेत. तत्पूर्वी अमरावती विभागाचे समन्वयक संजय खोडके यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात रविवार (ता.तीन) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीला निरीक्षक अशोक परळीकर यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम स्थळासह अनेक ठिकाणी ‘जिल्हाध्यक्ष हटाव,राष्ट्रवादी बचाव’ फलक लावण्यात आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या फलकबाजी मुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह निवडणुकीपूर्वी चव्हाट्यावर आला आहे. काही वेळानंतर लावण्यात आलेले बॅनर हटविण्यात आले. असे असले तरी नेत्यांपुढे घडलेल्या या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफुस वाढल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com