आज भाजप इच्छुकांच्या मुलाखती

आज भाजप इच्छुकांच्या मुलाखती
नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सहा विधानसभा मतदारसंघातील भाजप इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्या मंगळवारी (ता.27 ) रविभवन येथे घेण्यात येणार आहेत. भाजपचे प्रदेश महामंत्री आमदार अतुल भातकर इच्छुकांसोबत चर्चा करणार आहेत.
जिल्ह्यात सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. सावनेर मतदारसंघात कॉंग्रेसचे सुनील केदार एकमेव आमदार आहेत. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत सावनेर येथील भाजपचे उमेदवार सोनबा मुसळे यांचा अर्ज बाद झाला होता. काटोल विधानसभाही भाजपने जिंकली होती. मात्र, आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी वर्षभरापूर्वीच आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. युती असताना काटोल आणि रामटेक मतदारसंघ शिवसेनेकडे होते. मात्र, आता दोन्ही जागी भाजपचे आमदार निवडून आले आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली आहे. काटोल आणि सावनेर रिकामे असल्याचे येथे इच्छुकांना संधी आहे. अशा सर्व इच्छुकांसोबत मुलाखतीत चर्चा केली जाणार आहे. त्यांची तयारी, क्षमता जाणून घेतली जाणार असल्याचे समजते. रविभवन येथे दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुलाखती घेण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com