हिंदी अनुवादातून "ग्रामगीते'ची विटंबना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित ग्रामगीतेच्या हिंदी अनुवादामध्ये अनेक चुका आहेत. या चुका म्हणजे ग्रामगीतेची विटंबनाच असल्याचा आरोप श्रीगुरुदेव युवा मंचचे प्रवर्तक ज्ञानेश्‍वर रक्षक यांनी केला. अभ्यासक नसलेल्या संबंधित व्यक्तीवर राज्य सरकारने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

तुकडोजी महाराजांचे अभ्यासक नसलेले, भाषेचा शास्त्रशुद्ध अभ्यास नसलेले ग्रामगीतेचा अनुवाद करीत आहे. मध्यंतरी ग्रामगीतेच्या ओव्यांना मोडक्‍या तोडक्‍या भाषेमध्ये "पद्‌मगीता' नावाने प्रकाशित केले होते. माफी पत्र घेऊन ते नष्ट करण्यात आले. आता महाराजांच्या ग्रामगीतेची हिंदी भाषेमध्ये अनुवादित आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे. शिवाजी पंढरीराव कृदत्त यांच्या या हिंदी अनुवादित ग्रामगीतेतून राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेची विटंबना होत आहे. त्यातील महाराजांचे छायाचित्र तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेशी मिळतेजुळते नाही. तसेच ग्राम गीता, राष्ट्र संत, तुकडो जी अशा तुटक शब्दांमध्ये महाराजांचा उल्लेख अनुवादित ग्रामगीतेमध्ये आहे. अनुवादित ग्रामगीतेमधील अर्पण पत्रिकेचे मूळ अर्पण पत्रिकेशी साधर्म्य आढळत नाही. त्यातच अुनवादकाने स्वत:च्या नावाचा त्यात उल्लेख करण्याचा प्रताप केला आहे. राष्ट्रसंतांनी जागतिक कीर्तीच्या चित्रकारांकडून 41 महापुरुषांचे चित्र काढून घेतले आहे. या ग्रामगीतेत कुठलाही संबंध नसलेल्या महापुरुषांच्या चित्रांचा वापर केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The irony of gramgita

टॅग्स