esakal | कापसाच्या डिजिटल नोंदणीमुळे शेतकऱ्यांची गैरसोय थांबणार; राजुरा येथे सीसीआय कापूस खरेदी सुरू  
sakal

बोलून बातमी शोधा

it becomes easy to sell cotton for farmers as digital registration done

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कवडू पोटे, सचिव मंगला मेश्राम, सीसीआय ग्रेडप्रमुख दिलीप कांबळे, जिनिंग मालक राधेश्‍याम अडानिया, मनमोहन सारडा उपस्थित होते.

कापसाच्या डिजिटल नोंदणीमुळे शेतकऱ्यांची गैरसोय थांबणार; राजुरा येथे सीसीआय कापूस खरेदी सुरू  

sakal_logo
By
श्रीकृष्ण गोरे

राजुरा (जि. चंद्रपूर) : सीसीआयअंतर्गत कापूस खरेदीला सुरुवात झाली असून, कृषी उत्पन्न बाजार समिती राजुरा येथील किसान जिनिंग ऍण्ड प्रेसिंग तुलना व गणेश कोटेक्‍स खामोना येथे 19 नोव्हेंबरपासून सीसीआय कापूस खरेदी प्रारंभ करण्यात आला आहे. प्रथम कापूस विक्रीचा बहुमान चंदनवाही येथील सुनंदा जीवतोडे व गोवरी येथील हरीचंद्र जुनघरी या शेतकऱ्यांना मिळाला आहे.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कवडू पोटे, सचिव मंगला मेश्राम, सीसीआय ग्रेडप्रमुख दिलीप कांबळे, जिनिंग मालक राधेश्‍याम अडानिया, मनमोहन सारडा उपस्थित होते. कोरोना प्रादुर्भावामुळे कापूस खरेदीला विलंब झाल्याने गतवर्षी कापसाची खरेदी करण्यामध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. तरीसुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात बहुतांश कापूस खरेदी राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीने केली होती. 

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये व शेतकऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी डिजिटल पद्धतीने कापसाची नोंदणी करण्यात यावी, अशा सूचना सभापती कवडू पोटे यांनी केल्या आहेत.

पूर्वी एका सातबाऱ्यावर 40 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात येत होती. आता एका शेतकऱ्याचा पूर्ण कापूस एकाच सातबारावर खरेदी होणार आहे. मात्र, त्यामध्ये एका सातबारावर पहिल्या दिवशी 40 क्विंटल पंधरा दिवसाच्या फरकाने 40-40 क्विंटल अशा पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहे. कोणत्याही शेतकऱ्याला खासगी व्यापाऱ्याकडे कापूस विकण्याची नामुष्की येणार नाही. सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाणार असल्याची माहिती सभापती पोटे यांनी दिली..

क्लिक करा - ह्रदयद्रावक! चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या

डिजिटल पद्धतीने कापसाची नोंदणी झाल्याने त्वरित खरेदी होत आहे. मागीलवर्षी झालेली गैरसोय यावर्षी होणार नाही. मात्र, शेतकऱ्यांचा सर्व प्रकारचा कापूस खरेदी करणे आवश्‍यक आहे.
- पद्माकर उरकुडे,
शेतकरी, साखरी

संपादन - अथर्व महांकाळ