जांभूळखेडा भूसुरुंग स्फोटप्रकरणी दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोन समितीची सदस्य तसेच वेस्टर्न सबझोनल प्रमुख उप्पुगंटी निर्मलाकुमारी ऊर्फ नर्मदाक्का (वय 58) व पती राणी सत्यनारायण ऊर्फ किरण (वय 70) या दोन जहाल नक्षलवादी दांपत्यास गडचिरोली पोलिस दलाने अटक केली होती. न्यायालयाने दोघांनाही 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी या दोघांकडून 1 मे रोजी घडवून आणलेल्या जांभूळखेडा येथील भूसुरुंग स्फोटाबाबत विचारणा केली असता त्यांनी दिलीप श्रीराम हिडामी (वय 22), परसराम मनिराम तुलावी (वय 28) दोघेही रा. लवारी, ता. कुरखेडा अशी नावे सांगितल्याने या दोघांनाही गडचिरोली पोलिस दलाने अटक केली आहे.

1 मे रोजी उपविभाग कुरखेडात अंतर्गत येत असलेल्या जांभुळखेडा येथे नक्षल्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 पोलिस जवान शहीद व 1 खासगी वाहनचालकाचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यातील इतर आरोपींच्या सहभागाविषयी पोलिस दलाने अटक केलेल्या जहाल नक्षली नर्मदाक्का व पती राणी सत्यनारायण यांची विचारपूस केली असता, त्यांनी लवारी येथील दिलीप हिडामी व परसराम तुलावी या नक्षल सदस्यांमार्फत भूसुरुंग स्फोट घडविण्यात आल्याची माहिती दिली.
12 दिवसांची पोलिस कोठडी
पोलिसांनी दिलीप हिडामी व परसराम तुलावी यांना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले. नमूद गुन्ह्यात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. दिलीप हिडामी व परसराम तुलावी यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jambhulkheda Bhusurung blast case, both arrested