मजुरी करून शिक्षण घेतलेले अग्रमन नक्षली हल्ल्यात हुतात्मा

Agraman Rahate
Agraman Rahate

आर्णी : 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी पोलिसांचा सन्मान होत असतानी दूसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी भूसूरूंग स्फोटात पोलिस दलातील जवान हुतात्मा झाल्याची घटना घडली. आर्णी तालूक्यातील तरोडा मांगूळ येथील अग्रमन बक्षी रहाटे (वय 35) हा नक्षलवादी भूसूरूंग स्फोटात हुतात्मा झाल्याची माहीती प्रशासना अंतर्गत तरोडा येथे मिळताच कुटुंबियांसह तरोडा ग्रामस्थकावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावावर शोकाकळा पसरली आहे.

अतिशय गरिब कुटुंबातील अग्रमन रहाटे यांनी रोजमजूरी करून शिक्षण घेतले. 2004 रोजी वडील बक्षी रहाटे यांचे निधन झाले, तर आई निर्मला रहाटे या शेतमजूरी करत आहेत. बहिण सूकेशना व लिना यांचे लग्न झाले असून लहान भाऊ आशिष रहाटे हा तरोडा येथील पोलिस पाटील आहे. अडीच एकर कोरडवाहु शेती आहे. घरीची जबाबदारी म्हणून घरातील सर्वात मोठा असलेले अग्रमन रहाटे (रा. तरोडा (मांगूळ), जि. यवतमाळ) हे 1 फेब्रुवारी 2011ला गडचिरोली पोलिसदलात दाखल झाले होते. पोलिस दलात दाखल झाल्यावर त्यांचे रेश्मा रहाटे सोबत लग्न झाले असून गार्गी रहाटे (वय 4), आरूषी रहाटे वय (वय 2) या दोन मुली आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील कूरखेडा येथून जवळच असलेल्या लेडारी गावाजवळ नक्षलवादी विरोधी कार्यवाही करत असताना नक्षलवादी भूसूरूंग स्फोटात महाराष्ट्र दिनीच अग्रमन बक्षी रहाटे यांना वीरमरण आले असल्याची माहीती प्रशासनातर्फे दुपारी दोन वाजता दरम्यान तहसिलदार श्रीकांत निळे यांनी आशिष रहाटे पोलिस पाटील यांच्यासह तरोडा ग्रामस्थकांना दिली असता तरोडा ग्रामस्थकांवर शोकाकळा पसरली. आपल्या गावातील मनमिळावू स्वभावाचा अग्रमन हुतात्मा झाला असून सरकारने भ्याड हल्याचा बदला घ्यावा अशी मागणी केली आहे.

अग्रमन रहाटे यांचे शव आणण्यासाठी भाऊ अशिष रहाटे व नातेवाईकांसह तरोडा ग्रामस्थ गडचिरोलीकडे रवाना झाले असून, आज सायंकाळपर्यंत तरोडा येथे येणार असल्याचे तरोडा ग्रामस्थक बोलत होते. कुटुंबियांसह नातेवाईकांनी जवान अग्रमन रहाटे यांना वीरमरण आले असल्याची कुठलीही माहिती आई निर्मला बक्षी रहाटे व पत्नी रेश्मी अग्रमन रहाटे यांना देण्यात आलेली नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com