जव्वाद पटेल यांना यंग इनोव्हेटर पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

अकोला: 24 वर्षीय यंग इनोव्हेटर व सायंटिस्ट जव्वाद पटेल यांना वि आय टी विश्वविद्यालय, वेल्लोर तामिळनाडू कडून यंग इनोव्हेटर पुरस्कारांनी सन्मानित केला गेला. आरोग्य उर्जा कृषी आणि जल क्षेत्रातील संशोधक जव्वाद त्यांच्या संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल या पुरस्कारसाठी घेण्यात आली.

त्यांना समाजोपयोगी संशोधनात विशेष रस असून इनोव्हेशन क्षेत्राची आवड आणि संशोधक वृत्ती यांची सांगड घालून त्यांनी आरोग्य क्षेत्रातील संशोधनात छातीच्या कर्करोग शोधून काढणारे डिवाइस आणि रक्त नमुना न घेता मधुमेह चाचणी करणारे डिवाइस तयार केले आहेत. ऊर्जा क्षेत्रातील त्यांनी सौर ऊर्जा वर चालणारी कार तयार केली एकद चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटर पर्यंत ही कार आरामात चालू शकते जल क्षेत्रात संशोधनात त्यांनी हवेच्या आद्रता पासून पाणी तयार करणारे डिवाइस तयार केले .
जव्वादचे नावावर 2 पेटेंट 39 रिसर्च पेपर आणि 47 पुरस्कार संशोधन  मध्ये मिळालेले आहे.

Web Title: Jawwad Patel received the Young Innovator Award