esakal | कोण होणार करोडपतीमध्ये विचारला 'सकाळ'बाबत प्रश्न, भंडाऱ्याचे कृषी पर्यवेक्षक बनले लखपती
sakal

बोलून बातमी शोधा

jaykrushna akare

'कोण होणार करोडपती'मध्ये 'सकाळ'बाबत प्रश्न, भंडाऱ्याचे आकरे बनले लखपती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भंडारा : कोण होणार करोडपती सिजन पाचच्या (Kon honar crorepati season 5) कार्यक्रमात 'सकाळ' माध्यम समूहाबद्दल (sakal media group) प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे अगदी बरोबर उत्तर देत भंडारा जिल्ह्यातील लाखनीतील जयकृष्ण आकरे लखपती झाले आहेत.

हेही वाचा: VIDEO : लक्ष्मणची रेखा जगात भारी, जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत पटकाविला पहिला क्रमांक

सकाळ माध्यम समूहाबद्दल विचारलेला प्रश्न

सकाळ माध्यम समूहाबद्दल विचारलेला प्रश्न

जयकृष्ण आकरे हे तालुका बिज गुणन प्रक्षेत्र पहेला येथे कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. यांनी पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या. परंतु, त्यांना त्यात यश आले नाही. परंतु, त्याच अभ्यासाच्या आधारे ते आज त्यांनी ही स्पर्धा जिंकली. 'सोनी मराठी'वरील 'कोण होणार करोडपती' सीजन पाच या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी पहिल्या सिजनपासून नोंदणी करत होते. परंतु, त्यांना यंदा हॉट सिटवर बसण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम ३१ ऑगस्टला प्रसारित करण्यात आला. या स्पर्धेत त्यांनी अकरा प्रश्नांचे उत्तर देत सहा लाख चाळीस हजार रुपये जिंकले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडकर हे करतात. त्यांच्यासोबत भंडारा जिल्ह्यातील कृषी क्षेत्रावर सुद्धा आकरे यांनी चर्चा केली. जयकृष्ण यांच्या या कार्यक्रमातील सहभागामुळे जिल्ह्यातील नागरिकांना कार्यक्रम बघायची खूप उत्सुकता निर्माण झाली होती. जयकृष्ण यांनी बक्षिस जिंकल्यामुळे कृषी विभाग जिल्ह्यातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात आले.

सकाळ माध्यम सूमहावर विचारला होता प्रश्न -

जयकृष्ण यांचे कृषिविषयक शिक्षण झाले आहे. त्यामुळे त्यांना सकाळ माध्यम समूहावर प्रश्न विचारण्यात आला होता. 'अ‌ॅग्रोवन' हे कोणत्या माध्यम सूमहाचे आहे, असा तो होता. हा प्रश्न ८० हजारांसाठी होता. आकरे यांनी अगदी बरोबर उत्तर देत ८० हजार रुपयांचे बक्षिस देखील आपल्या नावावर केले आहे.

मिळालेले बक्षीस मुलांच्या शिक्षणावर खर्च करणार -

जयकृष्ण आकरे यांच्या परिवारात आई, वडील, पत्नी व दोन मुले आहेत. त्यांनी या स्पर्धेत जिंकलेले सहा लाख चाळीस हजार रुपये ते मुलांच्या शिक्षणावर खर्च करणार असल्याचे सांगितले.

loading image
go to top