जेसीपीई सहाव्यांदा सर्वसाधारण विजेता

जेसीपीई
जेसीपीई

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत हिंगणा येथील जोतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाने (जेसीपीई) सलग सहाव्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाच पटकाविले. विद्यासागर महाविद्यालयाचा आदर्श भुरे आणि चक्रपाणी महाविद्यालयाची निकिता राऊत यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा पुरस्कार देण्यात आला. 
जोतिबा महाविद्यालयाने सर्वाधिक 79 गुण मिळविले. एस. बी. सिटी महाविद्यालयाने 57 गुणांसह उपविजेतेपद आणि ईश्‍वर देशमुख शा. शि. महाविद्यालयाने 44 गुणांसह तिसरे स्थान पटकाविले. पुरुषांच्या थाळीफेकीत जोतिबा महाविद्यालयाच्या गोविंदने 49.64 मीटरचा, तर महिलांच्या लांब उडीमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या उन्नती चिल्केवारने 5.19 मीटरचा नवा स्पर्धा विक्रम नोंदवून शेवटचा दिवस गाजविला. निकाल : 200 मीटर (पुरुष) : गोपाल पलांदूरकर(हिस्लॉप महाविद्यालय), आदर्श भुरे(विद्याभारती कॉलेज, सेलू), मंथन कावडे(धनवटे नॅशनल कॉलेज). (महिला) : जया राणी(अजित वाडेकर शा. शि. महाविद्यालय), साक्षी आंबेकर, उत्कर्षा लेंडे(एस. बी. सिटी महाविद्यालय). 800 मीटर (पुरुष) : संदीप (साकेत महाविद्यालय), दिशांत वर्मा (बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालय), आकाश मेश्राम(सी. पी. ऍण्ड बेरार महाविद्यालय). (महिला) : सायली वाघमारे(धरमपेठ महाविद्यालय), गीता चाचेरकर(लेमदेव पाटील महाविद्यालय), हिमानी धरणे (ताई गोळवलकर कॉलेज, रामटेक). अर्धमॅरेथॉन (पुरुष): मोहित (पीजीटीडी), विकेश शेंडे(जे. एम. पटेल कॉलेज, भंडारा), विकेश(साकेत शा. शि. महाविद्यालय). (महिला) : स्वाती पंचबुद्धे (हजरतबाबा ताजुद्दीन महाविद्यालय), प्रणाली बोरेकर(चक्रपाणी महाविद्यालय), तेजस्विनी लामकसे(जे. एम. पटेल कॉलेज, भंडारा). लांब उडी (पुरुष) : रितिक जामदार (रेवनाथ चौरे कॉलेज, सावनेर), पंकज वाघ(यशवंत महाविद्यालय, वर्धा), रोहित शर्मा (पीएडब्ल्यूएसएसएम). (महिला) : उन्नती चिल्केवार(इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स), स्नेहा कोरे(विदर्भ महाविद्यालय, लाखनी), निधी मोहोड(तायवाडे कॉलेज, कोराडी). थाळीफेक (पुरुष) : गोविंद, आदित्य तन्वर (दोघेही जोतिबा शा. शि. महाविद्यालय), सुरभित सनविजय (वायसीसीई). (महिला) : शिवानी नेगी, प्रीती शर्मा(दोघेही जोतिबा महाविद्यालय), पूनम सिनराम(विद्यासागर काळे महाविद्‌यालय, रामटेक). 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com