esakal | शासकीय कर्मचाऱ्यांनो, आता कार्यालयात जिन्स पॅन्ट, टी-शर्ट अन् स्लीपर्सवर बंदी
sakal

बोलून बातमी शोधा

jeans t shirt and slippers are banned in government offices

शासकीय कार्यालयांत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसह कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांनासुद्धा हा नियम लागू राहणार आहे. शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची वेशभूषा अनुरूप ठरत नसल्याने जनमानसात प्रतिमा मलीन होते.

शासकीय कर्मचाऱ्यांनो, आता कार्यालयात जिन्स पॅन्ट, टी-शर्ट अन् स्लीपर्सवर बंदी

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : राज्य शासनाच्या सर्व प्रकारच्या कार्यालयांमध्ये आता जिन्स पॅन्ट व टी शर्टवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच दर शुक्रवारी खादीचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.  

हेही वाचा - विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे होणार हलके; नवीन शैक्षणिक सत्रापासून होणार अंमलबजावणी

शासकीय कार्यालयांत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसह कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांनासुद्धा हा नियम लागू राहणार आहे. शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची वेशभूषा अनुरूप ठरत नसल्याने जनमानसात प्रतिमा मलीन होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेशभूषा अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याचा परिणाम एकंदरीत कामकाजावरसुद्धा होतो, असे शासनाचे मत आहे. त्यामुळे दैनंदिन पेहराव व्यवस्थित असावा, यासाठी गडद रंगाचे चित्रविचित्र पेहराव तसेच जिन्स पॅन्ट व  टी शर्ट धारण करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. खादीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने किमान शुक्रवारी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खादी कपड्यांचा पेहराव करावा, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.  

हेही वाचा -  ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले; ५५३...

स्लिपर्सला मनाई -
महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्‍यतो चपला, सॅण्डल, बूट यांचा तर पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बूट आणि सॅण्डलचा वापर करावा. कार्यालयामध्ये स्लिपर्सचा वापर करू नये, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा - आंबिया झाला उत्पादकांसाठी कडू; मागणी नसल्यामुळे...

निर्णयाचे स्वागत आहे. मात्र, सरसकट जिन्स पॅन्ट बंदी योग्य होणार नाही. विचित्र रंगाच्या जिन्स पॅन्टवर बंदी घालणे समजू शकतो. मात्र, सर्व प्रकारच्या जिन्स पॅन्ट वापरावर बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय योग्य नाही. आम्ही शासनस्तरावर पाठपुरावा करू. 
- पंकज गुल्हाने, अध्यक्ष, जि. प. कर्मचारी संघटना.