अल्पवयीन गुन्हेगार पोलिसांची डोकेदुखी!

भगवान वानखेडे
गुरुवार, 25 एप्रिल 2019

अकोला : अकोल्यातील गुन्हेगारी जरी नियंत्रित असली तरी अल्पवयीन गुन्हेगारांची संख्येत भर पडत आहे. 14 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचा विनयभंग, चोरी, घरफोडी, लूटमार आणि शस्त्राचा वापर अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग दिसतो. अल्पवयीन मुलांना कायद्याचे संरक्षण असल्याने त्यांना अटक करता येत नाही. त्यामुळे अल्पवयीन गुन्हेगार सध्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

शहरातील झोपडपट्टी परिसरात बाल गुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे. विभक्‍त कुटुंब आणि आई-वडिलांना असलेले दारू-अमली पदार्थांचे व्यसन यांचा परिणाम मुलांवर होतो. संस्कारांचा अभाव आणि वाईट संगतीमुळे अनेक मुले वाममार्गाला लागत आहेत. काही केवळ शौक म्हणून चोरी, घरफोडी तसेच दुचाकी चोरण्यासारखे गुन्हे करीत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले. व्यसनाची पूर्तता करण्यासाठी किंवा मोबाईल, कपडे, घड्याळ, बाइक किंवा अन्य चैनीच्या वस्तू मिळविण्यासाठी मुले चोरी करण्यास धजावतात. गुन्ह्याच्या चौकशीदरम्यान अशा मुलांना ताब्यात घेतल्यानंतर पालकांना बोलावून घ्यावे लागते. अशा मुलांना बाल न्यायमंडळासमोर हजर केले जाते. 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांचा विधिसंघर्षग्रस्त बालक असा उल्लेख केला जातो. त्यांना कायद्याने मोठे संरक्षण दिले आहे.

झोपडपट्टीत रुजतात बीजे
एकीकडे शहर जरी झपाट्याने आधुनिकीकरणाच्या दृष्टीने आगेकूच करीत असले तरी दुसरीकडे अद्यापही झोपडपट्टी परिसर तसाच मागासलेला आहे. गावाकडची संस्कृती आणि समज घेऊन शहरात वास्तव्यास आलेले कुटूंबावर शहरी वातावरणाचा मुळात वाईट वातावरणाचा अधिक प्रभाव पडतो. यामुळेच लाईफ स्टाईल चांगली करण्याच्या नांदात वाईट व्यसनाच्या आहारी जाणारी मुले गुन्हेगार बनत अाहेत.

बालनिरीक्षणगृह योजना
18 वर्षे कमी वयाचा मुलगा गुन्ह्यात सहभागी आढळल्यास त्याला अटक करता येत नाही. त्याला काही दिवस बाल निरीक्षणगृहात ठेवले जाते. पालकांच्या संमतीने किंवा चांगल्या वागणुकीच्या हमीवर त्याला सोडून दिले जाते. मात्र, मात्र ‘काही होत नाही रे’ अशी भावना मनात रुजल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होते. पुढे गंभीर गुन्हे करण्यास चालना मिळते.

Web Title: juveniles are headache for Police