चिमूर : लोणारे खूनप्रकरणी आरोपी कैलास लोणारे गजाआड

lonare
lonare

चिमूर : चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुरुदेव वार्ड येथील बापुराव नागोराव लोणारे याला जागेच्या वादावरून ओमप्रकाश तुकाराम लोणारे व कैलास तुकाराम लोणारे या दोघा भावांनी मिळून 3 सप्टेंबरला काठी व फावड्याने मारून गंभीर जखमी केले होते. नागपुरला उपचारादरम्यान त्यांचा 11 सप्टेंबरला मृत्यू झाला.

आरोपींविरोधात हत्याचा गुन्हा नोंदविण्यात आला व 3 सप्टेंबरला रात्री ओमप्रकाश यास अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपी कैलास लोणारे हा पोलिसांना एक महिना सतत गुंगारा देत होता. अखेर 2 ऑक्टोबरच्या मध्यरात्री नेरी बस स्टॉप वरून अटक करण्यात आली.

चिमूर नगर परीषद क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या नेहरू चौक गुरूदेव वार्ड येथील बाबुराव नागोराव लोणारे हा वृद्ध आपल्या घरापुढे वाळायला ठेवलेली चणाडाळ राखत असताना शेजारी राहणारे ओमप्रकाश तुकाराम लोणारे व कैलास तुकाराम लोणारे हे दोघे भांवड जागेच्या वादावरून  संगनमत करून 3 सप्टेंबरला सांयकाळी पावणेपाचच्या दरम्यान  हातात काठी व फावडे घेऊन आले व भांडण करून बाबुरावच्या उजव्या पायावर फावडयाने व काठीने डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात टाकून आजूबाजूचे नागरिक जमा झाल्याने पडून गेले. बाबुराव लोणारे याला जखमी अवस्थेत चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरीता नेले असता गंभीर अवस्था असल्याने अती तातडीने नागपुरला पाठवण्यात आले होते.

जखमी वृद्धाच्या तोंडी तक्रारीवरून आणि वैद्यकीय अहवालावरून आरोपी ओमप्रकाश लोणारे व कैलास लोणारे यांचे विरोधात कलम 326, 307, 34 भांदवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. त्याप्रमाणे मध्यरात्री ओमप्रकाशला अटक करण्यात आली होती व कैलास हा फरारच होता.

उपचारा दरम्यान गंभीर जखमी तुकाराम लोणारेचा 11 सप्टेंबरला मृत्यू झाला. सदर आरोपी विरोधात हत्याचा गुन्हा कलम 302 प्रमाणे नोंद करण्यात आला. फरार आरोपीला अटक लवकर अटक करण्यात यावे अशी मागणी मृतकाच्या परीवाराकडून जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन व पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन सुद्धा करण्यात आली होती. मात्र कैलास सतत गुगांरा देतच होता. अखेर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक प्रमोद मडामे यांच्या नेतृत्त्वात नेरी येथील बस स्टॉपवर कैलासला मध्यरात्री अटक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com