खामगाव : काका रुपारेल यांच्या उपोषणाची सांगता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

दुपारी फिस्कटली होती बोलणी!
​काका रूपारेल यांच्या उपोषणाची सांगता करण्यासाठी दुपारी २ वाजता उपमुख्याधिकारी रविंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात पालिकेचे पथक उपोषणस्थळी दाखल झाले. यावेळी पाणी पुरवठा अभियंता नीरज नाफडे, प्राजक्ता पांडे, आनंदमोहन अहीर यांनी उपोषण सोडविण्याची विनंती केली. मात्र, यावेळी बोलणी फिस्कटल्याने अखेर मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत या उपोषणाची सांगता झाली.

खामगाव : नगर पालिकेसमोर सुरू असलेल्या ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक किशोर उर्फ काका रुपारेल यांच्या बेमुदत उपोषणाची मंगळवारी (ता. ९) सायंकाळी सांगता करण्यात आली. नगर पालिका प्रशासनाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याने काका यांनी चिमुकल्या मुलीच्या हस्ते आपले उपोषण सोडले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरूस्तीमध्ये अनियमितता तसेच अनेक ठिकाणी पाईप लाईन फोडण्यात आली असल्याने खामगाव शहरात पाणी पुरवठा अनियमित होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. शहरातील अनियमीत पाणी पुरवठ्याविरोधात  सामाजिक कार्यकर्ते किशोर (काका ) रूपारेल यांनी नगर परिषद कार्यालयासमोर ८ एप्रिलपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. मंगळवारी त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस होता. दरम्यान, सायंकाळी  काका रूपारेल यांना नगर पालिका प्रशासनाने योग्य उपाय योजना करण्याचे लेखी आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. कु. सई पवन गरड या चिमुकलीच्या हस्ते उसाचा रस देऊन काका रुपारेल यांचे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी  आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, नगराध्यक्ष अनिता डवरे,  भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, उपमुख्याधिकारी रविंद्र सूर्यवंशी, पाणी पुरवठा अभियंता प्राजक्ता पांडे, संजय मुन्ना पुरवार, संतोष डिडवाणी, सुनील अग्रवाल, जनार्दन हेंड, संदीप वर्मा, ओम शर्मा, नंदू भट्टड, पवन गरड, राम मिश्रा,  बाबा काळे, आनंद गायगोळ, नितेश खरात, आनंद मोहन अहीर, सूरजसिंह ठाकूर यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

शेकडो नागरिकांचा पाठिंबा
काका रुपारेल हे जेष्ठ  पत्रकार असून नागरिकांच्या विविध प्रश्नांवर ते लढा देत असतात. याधी सुध्दा त्यांनी लोकशाही मार्गाने अनेक प्रश्न सोडविले आहेत. पाणी प्रश्नावर आंदोलन सुरू केल्यावर काका रुपारेल यांना विविध संघटना आणि शेकडो नागरिकांनी पाठिंबा दिला होता. पालिका प्रशासनाने त्यांना मंगळवारी सुध्दा उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. दरम्यान आज लेखी आश्वासन मिळाल्या नंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.

दुपारी फिस्कटली होती बोलणी!
काका रूपारेल यांच्या उपोषणाची सांगता करण्यासाठी दुपारी २ वाजता उपमुख्याधिकारी रविंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात पालिकेचे पथक उपोषणस्थळी दाखल झाले. यावेळी पाणी पुरवठा अभियंता नीरज नाफडे, प्राजक्ता पांडे, आनंदमोहन अहीर यांनी उपोषण सोडविण्याची विनंती केली. मात्र, यावेळी बोलणी फिस्कटल्याने अखेर मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत या उपोषणाची सांगता झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kaka Ruparel indefinite strike ends in Khamgaon