श्रेय लाटण्यासाठी एमटीडीसीचा थयथयाट!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

नागपूर - कालिदास समारोहाचा ‘इव्हेंट’ साजरा करण्याची संधी गेल्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) श्रेय लाटण्यासाठी थयथयाट सुरू झाला आहे. काही वर्षे समारोह बंद असताना पर्यटन आणि सांस्कृतिक वारशाबद्दल अनभिज्ञ असलेल्या एमटीडीसीला अचानक जाग आली आणि अधिकार हिरावल्याची भावना निर्माण झाली. प्रसिद्धीची आवश्‍यकता नसलेला कोकणातील समुद्र संकेतस्थळाच्या दर्शनस्थळी लावणारे एमटीडीसी, विदर्भाच्या पर्यटन विकासाबाबत किती गंभीर आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

काही वर्षांचा खंड पडल्यानंतर गेल्यावर्षी विभागीय आयुक्त डॉ. अनुप कुमार यांच्या पुढाकाराने कालिदास समारोहाची पुनर्स्थापना झाली. रामटेक येथील कालिदास स्मारक व नागपुरातील  स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह अशा दोन ठिकाणी हा समारोह पार पडला. विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाने आयोजनासाठी ‘इव्हेंट’ कंपनीचा आधार न घेता प्रत्येक गोष्ट स्वतःच केली. कलावंतांशी संपर्क साधणे, समन्वय, आयोजन आणि व्यवस्था या गोष्टी थेट करण्याचा निर्णय घेतला. नागपूर शहरातील सांस्कृतिक संस्था, इतिहासतज्ज्ञ, साहित्यिकांना यात सामावून घेत समारोह व्यापक करण्याचा प्रयत्न केला.

गेल्यावर्षी यासंदर्भात समितीही स्थापन करण्यात आली. त्यामुळेच एमटीडीसीने १२ वर्षे  घेतलेल्या कालिदास समारोहामध्ये नागपूरकरांचा असलेला सहभाग आणि गेल्यावर्षीचा रसिकांचा उत्साह यामध्ये कमालीचा फरक दिसून आला. देशपांडे सभागृहातील रिकाम्या खुर्च्यांनी साजरा होणारा हा समारोह गेल्यावर्षी भरगच्च उपस्थितीत साजरा झाला. एवढेच नव्हे, तर रामटेकमधील कार्यक्रमासाठीदेखील नागपुरातील रसिकांनी उत्स्फूर्त हजेरी लावली. यंदाही तसेच चित्र आहे.  मात्र, समारोहाची तयारी जवळपास पूर्ण झाली असताना एमटीडीसीला अचानक जाग आली. जिल्ह्यातील सांस्कृतिक वातावरणाचा बेरंग करण्याचा प्रयत्न सुरू झाला. एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक हनमंत हेडे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया देण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.

खोडा घालण्याची सवय
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला कुठल्याही चांगल्या कार्यक्रमांमध्ये खोडा घालण्याची सवयच आहे. यापूर्वी मारबत महोत्सव आणि नागपूर महोत्सवाच्या बाबतीतही असाच प्रकार एमटीडीसीने केला होता. शेकडो वर्षांची परंपरा असलेला मारबत महोत्सव आपले होर्डिंग्ज लावून ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न एमटीडीसीने केला होता. गेल्यावर्षी नागपूर महोत्सव वांध्यात आणण्याचाही प्रताप केला होता.

Web Title: kalidas event mtdc