कामठी, काटोल, रामटेक होल्डवरच

कामठी, काटोल, रामटेक होल्डवरच

नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील कामठी, काटोल आणि रामटेक विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचा भाजपच्या दुसऱ्याही यादीत समावेश नसल्याने अनेकांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे कामठी मतदारसंघ राज्याचे ऊर्जा तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आहे. 
बावनकुळे यांना काटोलमधून निवडणूक लढण्यास सांगण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांनी यास नकार दिला आहे. त्यांना कामठीतच लढायचे आहे. कार्यकर्त्यांचाही आग्रह आहे. त्यांच्या समर्थकांनी बावनकुळे शुक्रवारी (ता.4) अर्ज दाखल करणार असल्याचेही फलक लावले असून सर्व कार्यकर्त्यांना कामठी तहसील कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन सोशल मीडियावरून केले आहे. काटोलमध्ये बावनकुळे यांना पाठवून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते अनिल देशमुख यांच्यावर दबाव टाकण्याची खेळी भाजप खेळत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अनिल देशमुखच भाजपचे उमेदवार राहतील अशी दिवसभर चर्चा होती. 
जयस्वाल भाजपमध्ये? 
रामटेकसाठी शिवसेनेचे आग्रह कायम आहे. मात्र, जिंकलेली जागा सोडण्यास भाजपने नकार दिला आहे. येथील शिवसेनेचे माजी आमदार आशीष जयस्वाल भाजपात येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या होती. मात्र, नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करून रामटेकमधून रेड्डी तर काटोलमधून चरणसिंग ठाकूर यांची नावे निश्‍चित केल्याचे समजते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com