

Old Water Tank Collapses Near Jalamb Railway Station
Sakal
शेगाव : खामगाव - जलंब रेल्वे लाईनवर जीर्ण झालेली पाण्याच्या टाकी कोसळल्याची घटना ता.२४ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. यावेळी रेल्वेची मुख्य विद्युत तार तुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, जलंब रेल्वे स्थानक नजीक रेल्वे कॉटर परिसरात अनेक वर्षांपासूनची पाण्याची टाकी जीर्ण झालेली होती. गेल्या काही दिवसांपासून परिसरात खोदकाम सुरू होते.