एकानेच धरले लाखांना वेठीस, बारा वर्षांपासून खामगावात ‘जल’ताप

एकीकडे मन नदीवरील शिर्ला डॅम उन्हाळ्यातही असा तुडुंब आहे, तर दुसरीकडे खामगाववासीयांच्या घशाला कोरड आहे. बाबू अच्छेलाल यांनी डॅमची पाहणी केली.
एकीकडे मन नदीवरील शिर्ला डॅम उन्हाळ्यातही असा तुडुंब आहे, तर दुसरीकडे खामगाववासीयांच्या घशाला कोरड आहे. बाबू अच्छेलाल यांनी डॅमची पाहणी केली.

खामगाव : नांदुरा शहर सोडताच नांदुरा ते खामगाव या १६ किलोमीटरच्‍या राष्ट्रीय महामार्गावर रस्‍त्‍यात खड्डे की खड्डयात रस्‍ता, हेच कळत नव्‍हते. खामगावमध्ये प्रवेश होताच गुळगुळीत रस्‍ते पाहून बरे वाटले. गाडी जसजशी पुढे जात होती तसतशा मोठ्या इमारती, रुग्‍णालये, समृद्ध इतिहास असलेल्‍या शाळा दृष्टीस पडत होत्‍या. बसस्‍थानकावर पोहोचताच ‘सकाळ’चे खामगावचे बातमीदार निखिल देशमुख व जिल्‍हा वितरण प्रतिनिधी प्रदीप सनान्‍से यांनी ‘रिसिव्‍ह’ केले. थोडे ताजेतवाने होऊन आम्‍ही निघालो शहरात फेरफटका मारण्यासाठी. औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या खामगाव शहरात कामासाठी लगतचे तालुके, ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी येथेच राहुटी केल्याचे समजले. त्यामुळे शहर आडवं तिडवं वाढलं. त्यामानाने मूलभूत सुविधांचे नियोजन झाले नाही. त्यातूनच उभा राहिलेला भीषण प्रश्न म्हणजे पाणीटंचाईचा (Water scarcity). मग हाच विषय अजेंड्यावर घेतला आणि निघालो नागरिकांच्या भेटी घ्यायला. (Khamgaon suffers without water due to lack of coordination)

देशमुख सांगू लागले, रजत नगरी म्हणून ओळख असलेल्‍या खामगाव शहराची लोकसंख्या लाखभर आहे. कित्‍येक वर्षांपासून शहराला गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. वाढत्‍या लोकसंख्येमुळे धरणावरून होणारा पाणीपुरवठा पुरेसा नाही. याशिवाय जळका भडंग येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून येणारी पाइपलाइनसुद्धा जीर्ण झालेली असल्याने वारंवार लिकेजमुळे शहराचा पाणीपुरवठा विस्‍कळीत होतो. शहराची पाणी समस्‍या कायमस्‍वरूपी निकाली काढण्यासाठी तत्‍कालीन सत्ताधाऱ्यांनी वाढीव पाणीपुरवठ्यासाठी २००५ साली शिर्ला डॅम प्राेजेक्‍टची आखणी केली. प्रत्‍यक्षात २००९ मध्ये कामाची वर्कऑडर निघाली; परंतु बारा वर्षे लोटूनही नागरिकांना पाणी मिळाले नाही. दरवर्षी उन्‍हाळ्यात दहा, बारा दिवसांनी नळाला पाणी येते. निवडणुकीच्‍या वेळी पाणीप्रश्न प्रत्‍येक पक्षाच्‍या जाहीरनाम्‍यात असतो; परंतु नळाला २४ तास पाणी देण्याचे दाखविलेले स्वप्न लोकप्रतिनिधी पूर्ण न करू शकल्याने शहरवासीयांच्‍या डोईवर अजून असेे किती उन्‍हाळे राहिलेत, असा प्रश्न नागरिक संतापून विचारत आहेत.

एकीकडे मन नदीवरील शिर्ला डॅम उन्हाळ्यातही असा तुडुंब आहे, तर दुसरीकडे खामगाववासीयांच्या घशाला कोरड आहे. बाबू अच्छेलाल यांनी डॅमची पाहणी केली.
पतीचा आला ओरडण्याचा आवाज; पत्नीने येऊन पाहताच सर्वच होते संपले

खामगाव शहराला गेरू माटारगाव येथील ज्ञानगंगा प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. सध्याची पाणीपुरवठ्याची योजना दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येपुढे कुचकामी ठरत आहे. ज्‍या पाइपलाइनवरून पाणीपुरवठा होताे ती पाइपलाइन जुनी झाल्‍याने वारंवार फुटणे, गळती होणे, व्‍हॉल्‍व्‍ह लिक होणे अशा अनेक अडचणींमुळे महिन्‍यातून एक-दोन वेळा पाणीपुरवठ्याचे नियोजन बिघडलेले असते. फेरफटका मारताना आमचा प्रवेश झाला तो गावातील मध्य वस्‍ती असलेल्‍या जुना फैल, नवाफैल, मस्‍तान चाैक, लोहार गल्ली परिसरात. या भागातील नळ आलेले होते. सार्वजनिक नळावर झालेली नागरिकांची गर्दी पाहून यांना ‘कोरोना’ची भीती वाटत नाही का? असा प्रश्न पडला.

पाण्यासाठीची शहरातील आणीबाणी पाहून आम्‍ही निघालो वाढीव पाणीपुरवठा योजनेची पाहणी करण्यासाठी अकोला बायपासने. टेंभुर्णा गावात प्रवेश करताच नव्‍यानेच झालेल्‍या गुळगुळीत रस्‍त्‍यावर गाडी धावू लागली. दहा किलोमीटरवर आल्‍यावर आवार येथे सुरू असलेल्‍या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. तेथे बांधकाम प्रगतिपथावर होते; परंतु या उन्‍हाळ्यात काम पूर्ण होण्याची चिन्हे दिसली नाही. त्‍यानंतर आम्‍ही निघालो मन नदीवरील शिर्ला डॅमकडे. प्रकल्‍पातील पाणी पाहून याचा उपयोग तरी काय, असा प्रश्न पडला.

एकीकडे मन नदीवरील शिर्ला डॅम उन्हाळ्यातही असा तुडुंब आहे, तर दुसरीकडे खामगाववासीयांच्या घशाला कोरड आहे. बाबू अच्छेलाल यांनी डॅमची पाहणी केली.
अवैध दारूविक्रीवर छापा टाकायला गेले पोलिस, पण सुमारे ५०० लोकांकडून वाहनांवर तुफान दडगफेक

२००९ पासून प्रश्न अनुत्तरितच

तत्‍कालीन नगराध्यक्ष सुभाष देशपांडे यांच्‍या कार्यकाळात शिर्ला प्रोजेक्‍टची आखणी करण्यात आली होती. त्‍यानंतर २००६ ते २००९ मध्ये सरस्‍वती खासणे सत्तेत आल्‍या. २००९ मध्ये अशोकसिंह सानंदा नगराध्यक्ष असताना वर्क ऑर्डर मिळाली. २००९ ला प्रत्‍यक्ष काम सुरू झाले. परंतु अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्‍यानंतर सरस्‍वती खासणे, गणेश माने, अशोकसिंह सानंदा नगराध्यक्ष राहिले. विद्यमान नगराध्यक्ष अनिता डवरे यांच्‍या कार्यकाळात पुन्‍हा या प्रोजेक्‍टचे काम हाती घेण्यात आले. त्‍यामुळे त्‍यांच्‍या कार्यकाळात तरी पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेल का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

‘साहेब, पाणी भरण्यासाठी दिवसाची रोजी जाते’

साहेब १०-१२ दिवसातून एकदा नळ येतो. मी बांधकाम मजूर आहे. ज्‍या दिवशी नळ येतो त्‍या दिवशी मजुरी पाडून घरी थांबतो. दोघेही नवरा-बायकाे मिळून नळाला पाणी असते ताेवर पाणी भरतो, ही कैफियत एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याने सांगितली. खरंतर ही कहाणी फक्त जुना फैल, नवाफैल, मस्‍तान चाैक किंवा लोहार गल्‍ली भागातील नसून, संपूर्ण खामगाव शहराची आहे. प्रत्येक वस्तीत घराबाहेर पिवळा, पांढरा, निळा नाहीतर काळ्या रंगाचा बॅरल ड्रम दिसतो. ज्यात लोक आपापलं पाणी साठवतात.

पाण्याअभावी उद्योगांचे रडगाणे

जिल्‍ह्यातील सर्वात मोठी एमआयडीसी खामगाव शहरात आहे. गेरू मारटरगाव येथून होणारा पाणीपुरवठा खामगाव शहर, खामगाव एमआयडीसी व नांदुरा शहर असा तीन ठिकाणी विभागला आहे. त्‍यामुळे पाणी पुरत नाही. २०१९ मध्ये उद्‌भवलेल्‍या भीषण पाणीटंचाईमुळे येथील अनेक उद्योग बंद ठेवावे लागले. वाढीव पाणीपुरवठ्याची समस्‍या निकाली काढून उद्योगांना पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी उद्योजक करीत आहेत.

शिर्ला येथील मन प्रकल्‍पाची साठवण क्षमता ४२.४८ दलघमी आहे. यातून जिल्‍हा परिषदेअंतर्गत येत असलेल्‍या लाखनवाडा २१ गाव पाणीपुरवठा योजनेद्वारे दोन टक्‍के पाणी वापरात येते. १२ गावांमधील सहा हजार ९७२ हेक्‍टर शेती क्षेत्राला सिंचनासाठी प्रकल्‍पातील पाणी दिले जाते. तरी खामगाव शहराची पाणीटंचाई मिटेल एवढा जलसाठा प्रकल्‍पात असतो.
-चंद्रशेखर देशमुख, शाखाधिकारी, मन प्रकल्‍प, शिर्ला नेमाने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com