esakal | अवैध दारूविक्रीवर छापा टाकायला गेले पोलिस, पण सुमारे ५०० लोकांकडून वाहनांवर तुफान दडगफेक

बोलून बातमी शोधा

toli nagpur
अवैध दारूविक्रीवर छापा टाकायला गेले पोलिस, पण सुमारे ५०० लोकांकडून वाहनांवर तुफान दडगफेक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदे सुरू आहेत. टोली परिसरातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर नागरिकांनी तुफान दगडफेक केली. ही खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने पोलिसांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे ४०० पोलिसांचा ताफा टोलीत पोहोचला. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांची धरपकड सुरू केली असून टोली वस्तीला छावणीचे स्वरूप आले आहे. रात्री उशिरापर्यंत १८ व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: उपराजधानीत भडकले गॅंगवॉर; भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी महिलेसह दोघांवर तलवारीने हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, रामटेकेनगर व टोली वस्ती ही अवैध दारू विक्री आणि जुगाराच्या अड्ड्यासाठी नावाजलेली आहे. टोलीतील अवैध धंद्यांना काही पोलिस कर्मचाऱ्यांचाही आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून टोलीत पोलिसांचा छापा पडला नव्हता. टोलीत अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती अजनी पोलिसांना मिळाली. अजनी पोलिसांचे पथक कारवाईसाठी तेथे वाहनाने पोहोचले. त्यांनी एका दारू अड्ड्यावर छापा घातला. तेथून पाच ते सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलिस वाहनातून नेत असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. परिसरातील महिला, लहान मुले व नागरिकांनी पोलिसांना घेराव घातला. पोलिसांच्या वाहनांवर तुफान दगडफेक केली. जीव वाचविण्यासाठी वाहन तेथेच सोडून पोलिस पळाले. त्यामुळे नागरिक आणखी आक्रमक झाले. काहींनी पोलिस वाहनाच्या काचा फोडल्या तर काहींनी पोलिस वाहन पेटवून देण्यासाठी चिथावणी दिली. वस्तीतील जवळपास पाचशेवर नागरिक गोळा झाले होते. त्यांनी पोलिसांना विरोध करीत घोषणाबाजी केल्याची माहिती आहे.

हेही वाचा: वादळानं पाळण्यातील बाळ १०० फूट उंच उडालं, आईनं फोडला एकच हंबरडा

सोशल मीडियामुळे घटना उघडकीस

पोलिसांचे वाहन टोलीत पोहचताच सामान्य नागरिकांनी आपला राग व्यक्त करीत पोलिसांच्या वाहनावर तुफान दगडफेक केली. पोलिसांवर दगडफेक करतानाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर झळकले. अनेक व्हॉट्सअ‌ॅप ग्रूपवर पोलिसांच्या इभ्रतीचे वाभाडे काढणारे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आणि ही घटना प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचली.

पोलिसांची मोठी कुमक -

अजनी पोलिसांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच स्वतः पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनेची दखल घेतली.सीपींनी आदेश देताच अति. पोलिस आयुक्त, उपायुक्त आणि अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी व सुमारे ४०० पेक्षा अधिक पोलिसांचा ताफा टोलीत पोहोचला. पोलिसांनी परिसराला घेराव घातला. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांची धरपकड सुरू केली. काही घरांमध्ये घुसून पोलिसांनी लोकांना ताब्यात घेतले. या घटनेने या परिसरात तणावाचे वातावरण आहे.

हेही वाचा: १५ टक्के कर्मचाऱ्यांमुळे विद्यापीठावर वाढला कामाचा बोजा; परीक्षेसह इतर कामे खोळंबली

पोलिसांना काढले सुखरूप बाहेर -

जुगार अड्डा संचालक आणि दारू विक्रेते यांच्यासह सामान्य नागरिक, महिला आणि युवकांनीही पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करीत पोलिसांना विरोध दर्शविला. त्यामुळे वाहनात बसलेले पोलिस कर्मचारी आणि महिला कर्मचाऱ्यांनी स्थिती लक्षात घेता पळ काढला. ते टोळीतील लहानसहान बोळीत लपून बसले. पोलिसांची कुमक पोहचताच लपून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे.

मोठा अनर्थ टळला!

नागरिकांच्या भावनांचा अचानक उद्रेक झाल्यामुळे पोलिसांवर अचानक हल्ला चढविला. जर पोलिसांनी पळ काढला नसता तर मोठा अनर्थ झाला असता. पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून छापा मारला. पोलिस कर्मचाऱ्यांकडे स्वतःची सुरक्षा करण्यासाठी फक्त काठी होती. दारू गाळणाऱ्यांना ताब्यात घेऊन ठाण्यात नेत असताना नागरिकांनी हल्ला केल्याची माहिती आहे.