खामगाव : वाहतूक पोलिसांच्या चिरीमिरीचा व्हिडीओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात वाहतूक पोलिसांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडीओ खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये शूट करण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून दुचाकी वाहन चालकावर कारवाहीच्या माध्यमातून पैशाची चिरीमिरी करणारा दोन वाहतूक पोलिसांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. व्हिडीओमध्ये एक पुरुष आणि एक महिला पोलिस असून, हे दोन्ही कर्मचारी खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. 

सदर व्हिडीओ हा १३ जुलै रोजी काढण्यात आल्याचे समोर येत आहे. शहर पोलिस स्टेशनच्या महिला वाहतूक पोलिस कर्मचारी यांनी दुचाकीवर तीन तरुण जात असताना वाहनावर कारवाही करत दोनशे रुपयांची पावती देऊन दोन हजार रुपये एक तिसऱ्या व्यक्तीच्या मध्यस्तीने घेत असताना तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ काढल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Khamgaon: The traffic police video viral