'खामगाव अर्बन'ची 31 ऑगस्टला सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

खामगाव - खामगाव अर्बन मल्टिस्टेट शेड्यूल बॅंकेला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शेतकरी कृषी कर्जमाफी गैरव्यवहार प्रकरणात नोटीस बजावली असून 31 ऑगस्टला याप्रकरणाची सुनावणी होणार आहे.

खामगाव - खामगाव अर्बन मल्टिस्टेट शेड्यूल बॅंकेला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शेतकरी कृषी कर्जमाफी गैरव्यवहार प्रकरणात नोटीस बजावली असून 31 ऑगस्टला याप्रकरणाची सुनावणी होणार आहे.

खामगाव अर्बन बॅंकेत शेतकरी कर्जमाफी गैरव्यवहार प्रकरणात बोगस लाभार्थी दाखवून तब्बल एक कोटी 97 लाख रुपयांचे अनुदान लाटण्याचा आरोप तत्कालीन सर्व संचालकांवर केला गेला आहे. तर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शेतकरी मनोहरराव पागृत यांची जनहित याचिका दाखल करून घेऊन संबंधितांवर याप्रकरणी नोटीस बजावली असून जवाब दाखल करण्यास सांगितले आहे.

दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये या बॅंकेत शेतकऱ्यांच्या नावावर खोटे सातबारा, खोटे आठ अ चे प्रमाणपत्र दाखवून एक कोटी 97 लाख रुपयांचे अनुदान लाटण्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बॅंकेच्या अध्यक्ष आशीष चौबिसा यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांचा दूरध्वनी बंद होता.

Web Title: khamgav vidarbha news khamgav arban bank 31st august hearing