

Dr Babasaheb Ambedkar Brass Statue Stolen from Buddha Vihar in Khaparkheda Police Begin Search for Accused
sakal
खापरखेडा : वलनी वस्ती येथील धम्मक्रांती बुद्ध विहारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पितळेची मूर्ती आणि तांब्याचा कलश असा एकूण १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विहाराचे अध्यक्ष सिद्धार्थ दामोदर भिमटे यांनी खापरखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.