esakal | खरीपाचे क्षेत्र ५३ हजारांनी वाढणार, सोयाबीनकडे पुन्हा झुकता कल
sakal

बोलून बातमी शोधा

kharip area will increased by 53 thousand in amravati

महाबीज, राष्ट्रीय कृषी निगम व खासगी क्षेत्रातून कृषी विभाग बियाण्यांची उपलब्धता करते. त्यानुसार बियाण्याचे नियोजन करण्यात आले असले तरी बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्‍यता अधिक आहे. त्यामुळे भाव तडकण्याची शक्‍यता लक्षात घेता घरगुती बियाण्यांचा अधिक वापर व शास्त्रोक्त पद्धतीने पेरणी  शेतकऱ्यांनी करावी, असे कृषी विभागाचे आवाहन आहे.

खरीपाचे क्षेत्र ५३ हजारांनी वाढणार, सोयाबीनकडे पुन्हा झुकता कल

sakal_logo
By
कृष्णा लोखंडे

अमरावती : आगामी खरीप हंगामात पेरणी क्षेत्रात तब्बल 53 हजार हेक्‍टर क्षेत्र वाढण्याची शक्‍यता कृषी विभागाने वर्तविली आहे. सोयाबीनला मिळालेला भाव बघता या पिकाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज असून त्यानुसार यंदा 7 लाख 28 हजार 112 हेक्‍टर क्षेत्रात खरिपाची पेरणी अपेक्षित करण्यात आली आहे. कृषी विभागाने बियाण्यांचे नियोजन केले आहे.

महाबीज, राष्ट्रीय कृषी निगम व खासगी क्षेत्रातून कृषी विभाग बियाण्यांची उपलब्धता करते. त्यानुसार बियाण्याचे नियोजन करण्यात आले असले तरी बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्‍यता अधिक आहे. त्यामुळे भाव तडकण्याची शक्‍यता लक्षात घेता घरगुती बियाण्यांचा अधिक वापर व शास्त्रोक्त पद्धतीने पेरणी  शेतकऱ्यांनी करावी, असे कृषी विभागाचे आवाहन आहे.

हेही वाचा - कारमध्ये सापडले सहा पेट्या जिलेटिन; दोघांना अटक, दहशतवादविरोधी पथकाची कारवाई

कापूस उत्पादकांचा जिल्हा, अशी ओळख असलेल्या या जिल्ह्यात गेल्या दीड दशकांत सोयाबीनचे पेरणी क्षेत्र वाढले आहे. सरत्या रब्बी हंगामातील 50 हजार हेक्‍टर क्षेत्र या पिकाच्या पेरणीखाली येणार असल्याने यंदा सोयाबीनची क्षेत्रवाढ होणार आहे. कृषी विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी 2 लाख 70 हजार क्षेत्र सोयाबीनखाली, तर 2 लाख 51 हजार हेक्‍टर कपाशीखाली राहणार आहे. तूर 1 लाख 30 हजार हेक्‍टर क्षेत्रात राहण्याचा अनुमान आहे. मूग व उडद या आंतरपिकांचे क्षेत्र अनुक्रमे 20 हजार व 10 हजार हेक्‍टर राहील.

हेही वाचा - हृदयद्रावक! पोटच्या मुलाचा मृत्यू होताच आईनंही सोडला प्राण; मायलेकाच्या मृत्यूमुळे हळहळले अख्खे...

असे आहे नियोजन - 
सोयाबीनच्या क्षेत्रात विक्रमी वाढीचा अंदाज असल्याने बियाण्याची मागणी साहजिकच वाढणार आहे. 2 लाख 2 हजार 500 क्विंटल बियाण्यांची गरज भासणार असून ग्राम बिजोत्पादन अंतर्गत 72 हजार 184, महाबीजद्वारे 80 हजार, राष्ट्रीय बियाणे निगमद्वारे 5 हजार तर खासगी क्षेत्रातून 45 हजार 135 क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. कपाशीसाठी 12 लाख 57 हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. 19 खासगी कंपण्यांकडे त्यासाठी नोंदणी करण्यात आली आहे. महाबीज पाच लाख तर पाच हजार 655 पाकिटे खासगी कंपनी देणार आहे.

प्रस्तावित खरीप पेरणी क्षेत्र (हेक्‍टर)

  • सोयाबीन - 2 लाख 70 हजार 
  • कपाशी - 2 लाख 51 हजार 
  • तूर - 1 लाख 30 हजार 
  • मूग - 20 हजार
  • उडद - 10 हजार
     
loading image