खाऊ गल्ली फूड फेस्टिव्हल उद्यापासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

नागपूर - खास खवय्यांसाठी दैनिक ‘सकाळ’च्या वतीने सहा जानेवारीपासून खाऊ गल्ली फूड फेस्टिव्हल सुरू होत आहे. चार दिवसांचा यंदाचा फेस्टिव्हल सिव्हिल लाइन्स येथील दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात राहणार आहे. दुपारी तीन ते रात्री १० या वेळेत खवय्यांना येथे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल.  

नागपूर - खास खवय्यांसाठी दैनिक ‘सकाळ’च्या वतीने सहा जानेवारीपासून खाऊ गल्ली फूड फेस्टिव्हल सुरू होत आहे. चार दिवसांचा यंदाचा फेस्टिव्हल सिव्हिल लाइन्स येथील दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात राहणार आहे. दुपारी तीन ते रात्री १० या वेळेत खवय्यांना येथे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल.  

मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलचे शेफ गगनप्रसाद माथूर फूड फेस्टिव्हलचे खास आकर्षण राहणार आहेत. ते चारही दिवस येथे उपस्थित राहतील. काही पदार्थ ते उपलब्ध करून देणार आहेत तसेच स्टॉलधारकांनाही मार्गदर्शन करणार आहेत. मके की रोटी, सरसो का साग, बटर, चिकन, पंजाबी छोले, दाल मखनी आदी पदार्थ ते बनवून ते खवय्यांना देतील.

फेस्टिव्हलचे प्रयोजक अमृतधारा ऑइल, सहप्रायोजक आरएमटी मसाले, सिलॅंत्रो रेस्टॉरेंट, शबाना बेकरी, तुलसी राइस ब्रॅंड ऑइल, निराली कुकिंग क्‍लॉसेस, तर हॉस्पिटिलिटी पार्टनर क्‍युझिन्स कॅटरर्स, फोटो पाटर्नर मूनलाइट, आउटडोअर पाटर्नर सेलॲड्‌स आणि केबल पाटर्नर इंन बीसीएन हे आहेत. स्टॉल आणि अधिक माहितीकरिता पराग कामडी ८८८८८५७३७७ आणि शैला मिर्झापुरे ७२१८२०५३४४ यांच्याशी संपर्क साधवा. 

व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांची चंगळ
खाऊ गल्ली फूड फेस्टिव्हलमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांची चंगळ राहणार आहे. दोन्ही पदार्थांच्या स्टॉलची स्वतंत्र व्यवस्था राहील. क्‍युझिन्स कॅटरिंगचे दर्शन पांडे यांच्या स्टॉलचे खास आकर्षण फेस्टिव्हलमध्ये राहणार आहे. नॉनव्हेजमध्ये फिश फ्राय, तंदुरी चिकन, चिकन टिक्का, अमृतसरी, खिमा पाव, चिकन बिर्याणी असे पदार्थ राहतील. व्हेजमध्ये इंदूर खाऊ गल्लीतील स्पेशल डिश मैसूर मसाला डोसा, छोले भटुरे, दिल्लीचे प्रसिद्ध पनीर भटुरे, व्हेज बिर्याणी, मुंबईच्या खाऊ गल्लीतील विविध प्रकारचे सॅंडविच, पंजाबी फूड खवय्यांना एकाच ठिकाणी चाखता येणार आहे. शिवाय नागपूर शहरातील चवदार पदार्थांचा चवदार आस्वाद घेता येणार आहे.
 

फेस्टिव्हलचे आकर्षण 
नागपूरची सांबारवडी

दिल्लीचे छोले बटोरे

जयपूरचा कांजीवडा
आग्राचे बडवी पुरी, आलूसार

मुंबईची तंदुरी फिश, खिमा पाव, वडा पाव, मिसळ

Web Title: khau galli food festival