esakal | हे देवा... अशी वेळ कुणावरही येऊ देऊ नको, गहाण घर सोडविण्यासाठी महिलेने स्वतःला विकले
sakal

बोलून बातमी शोधा

Kidnapped woman and sold in Rajasthan

लग्नासाठी महिलेला चार ते पाच युवक दाखविण्यात आले. पसंती न झाल्याने तेथून शंभर मीटर अंतरावर मुलगा दाखविला. महिलेचे त्या मुलासोबत लग्न लावले. त्याबद्दल महिलेस सत्तर हजार देण्यात आले. सय्यद इमरान याला पाच हजार रुपये कमिशन मिळाले. यानंतर इमरान परत आला. 

हे देवा... अशी वेळ कुणावरही येऊ देऊ नको, गहाण घर सोडविण्यासाठी महिलेने स्वतःला विकले

sakal_logo
By
संतोष तपकिरे

अमरावती : महिलेने काही कारणास्तव आपले घर गहाण ठेवले होते. आता तिला घर सोडवायचे होते. यासाठी ती प्रयत्न करीत होती. मात्र, तिला कोणताच मार्ग सापडत नव्हता. यामुळे सतत चिंतेत राहत होती. अशात तिने स्वतःला विकण्याचा निर्णय घेतला आणि पुढील प्रकार घडला... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला सय्यद इमरान ऊर्फ राजा सय्यद हबीब (वय 37, रा. मौलाना आझाद कॉलनी) याच्याकडे भंगारचे साहित्य विकायला येत होती. पाच वर्षांपासून त्यांची ओळख होती. तिने तिचे घर दहा हजार रुपयांत गहाण ठेवले होते. ते घर सोडविण्यासाठी पैशाची गरज असल्याचे तिने सय्यद इमरानला सांगितले होते.

हेही वाचा - काळ्या तांदळाचा भात कधी खाल्ला का; आरोग्यासाठी सर्वोत्तम, हे आहेत फायदे...

हे एकताच सय्यदचे कान उभे झाले. त्याने इंदूर येथील एका व्यक्तीसोबत लग्न लावून देतो. तो या लग्नाच्या बदल्यात पन्नास हजार रुपये देईल असे महिलेला सांगितले. घर सोडवायचे असल्याने महिलेने लग्नात होकार दिला. ती सय्यद इमरानसोबत इंदूरला गेली. तेथील धारियाने इमरानसह महिलेस वाहनात बसवून राजस्थानच्या बासवाडा येथे नेले. तेथे ते नवलसिंग सिसोदियाच्या घरी गेले. 

लग्नासाठी महिलेला चार ते पाच युवक दाखविण्यात आले. पसंती न झाल्याने तेथून शंभर मीटर अंतरावर मुलगा दाखविला. महिलेचे त्या मुलासोबत लग्न लावले. त्याबद्दल महिलेस सत्तर हजार देण्यात आले. सय्यद इमरान याला पाच हजार रुपये कमिशन मिळाले. यानंतर इमरान परत आला. 

आरोपींनी दिली उडवाउडवीची उत्तरे

अपहृत महिलेचा राजस्थानात बळजबरीने विवाह लावून दिल्याची तक्रार महिलेच्या आईने ठाण्यात दिली होती. त्याआधारे पोलिसांनी महिला हरविल्याची नोंद घेतली. तपास सुरू असताना सय्यद इमरान ऊर्फ राजा हा पोलिसांच्या हाती सापडला. सय्यद इमरानच्या सांगण्यावरून इंदूरचा अमरसिंग धारिया व राजस्थानचा नवलसिंग सिसोदिया या दोघांची पोलिसांनी महिलेबाबत विचारणा केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

अधिक माहितीसाठी - तणनाशकाने फस्त केले भुईमूग पीक! काय झाले असे...

असह्यतेचा घेतला फायदा

संबंधित महिला सय्यद इमरानकडे भंगारचे साहित्य विकायला येत होती. पाच वर्षांपासून त्यांची ओळख होती. तिने तिचे घर दहा हजार रुपयांत गहाण ठेवले असून, ते सोडविण्यासाठी पैशाची गरज असल्याचे सय्यदजवळ सांगितले होते. त्याने इंदूर येथील एका व्यक्तीसोबत लग्न लावून देतो, तो पन्नास हजार रुपये देणार असल्याचे तिला सांगितले. महिलेने होकार दिल्याने ती सय्यद इमरानसोबत इंदूरला गेली होती. तेथील धारिया नामक व्यक्तीने इमरानसह महिलेस वाहनात बसवून राजस्थानच्या बासवाडा येथे नेले. 

संपादन - नीलेश डाखोरे