अपहरणकर्त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

यवतमाळ : व्यावसायिकाच्या मुलाचे 50 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या सहा संशयित आरोपींच्या मुसक्‍या अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने अवघ्या बारा तासात आवळल्या होत्या. त्यांची पोलिस कोठडी संपल्याने शनिवारी (ता.20) न्यायालयापुढे हजर करण्यात आले. पुन्हा दोन दिवसांची सोमवार (ता.22) पर्यंत कोठडी देऊन संशयितांचा मुक्काम वाढवला आहे.

शुभम शंकर तोलवाणी (वय 25, रा. कंवरनगर, सिंधी कॅम्प), नीतेश बापूसिंग राठोड (वय 21, रा. दाभडी बोरगाव), अरविंद लक्ष्मण साबळे (वय 26, रा. पिंपळगाव), नीलेश उन्नरकाट (वय 37, रा. चांदणी चौक), सतीश देवीदास शेलोटकर (वय 37, रा. गोदाम फैल), सूरज ऊर्फ सपना विश्‍वनाथ शुक्‍ला (वय 38, रा. बाजोरीयानगर) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत.
तर, या कटाचा सूत्रधार किशन नारायण कोटवाणी (वय 25, रा. कंवरनगर) हा घटनेपासून फरार आहे. पोलिस पथक त्याच्या मागावर असून, अटक करण्याचे आव्हान आहे. शिकवणी वर्गातून दुचाकीने घराकडे परत जात असताना हर्ष नचवाणी (वय 17) याचे शिवाजीनगर परिसरातून सोमवारी (ता.15) सकाळी अपहरण करण्यात आले होते. 50 लाखांची खंडणी मागण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली होती. अवधूतवाडीच्या डीबी पथकाने सापळा रचून सहा जणांना अटक करून हर्षची सुखरूप सुटका केली. क्रिकेट सट्टेबाजीतून ही घटना घडल्याने पालकांत अजूनही चिंतेचे वातावरण बघावयास मिळत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kidnappers stay in custody