विद्यार्थिनीचे अपहरण करून बलात्काराचा प्रयत्न

अनिल कांबळे
मंगळवार, 1 जानेवारी 2019

नागपूर : कॉलेजमधून परत येत असताना एकतर्फी प्रेम करणाऱ्या मित्राने तिचे दुचाकीवरून अपहरण केले. स्वतःच्या घरी नेऊन बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून गिट्‌टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गोरेवाडा परिसरात राहणारी पीडित 16 वर्षीय मुलगी भावना (बदललेले नाव) सीताबर्डीतील नामांकित महाविद्यालयात अकरावीत शिकते. 

आरोपी विजय टापरे (वय 20, कटिया भंडार, गिट्टीखदान) याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम जुळले. गेल्या काही महिन्यांपासून तो भावनाचा पाठलाग करीत बोलण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, त्याला ती प्रतिसाद देत नव्हती. विजयची भावनाच्या मैत्रीणीशी ओळख झाली. तिने त्याची भावनाची भेट घालून दिली. दोघांत मैत्री झाली. परंतु विजय तिला प्रेमासाठी गळ घालत होता. ती प्रतिसाद देत नसल्यामुळे तिच्या मागेमागे कॉलेजपर्यंत जात होता. 29 डिसेंबरला चार वाजता भावना दुचाकीने कॉलेजमधून घरी जात होती. विजयने तिचा दुचाकीने पाठलाग केला व रस्त्यात अडविले. तिच्या दुचाकीवरून खाली उतरविले आणि
स्वतःच्या गाडीवर बसवले. 

गड्‌डीगोदाम चौकातील त्याच्या घरी नेले. तेथे त्याने तिला प्रपोज केले. मात्र, तिने स्पष्ट शब्दात नकार देत घरातून
बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी विजयने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच विजयची आई घरी आल्याने भावनाची इज्जत वाचली. भावनाने गिट्टीखदान पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

Web Title: Kidnapping student and then Attempt to Rape