मुलांनो, नका करू असे! स्टंटबाजीत दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू 

Milind Gaikwad
Milind Gaikwad

घुग्घुस (जि. चंद्रपूर) : मातीच्या ढिगाऱ्यावर स्टंटबाजी करणे एका विद्यार्थ्याला चांगलेच महागात पडले. स्टंटबाजी करताना मानेसह शरीराच्या अन्य भागाला जबर मार लागला. उपचारादरम्यान त्या मुलाचा सावंगी मेघे येथील रुग्णालयात मृत्यू झाला. मृताचे नाव मिलिंद बंडू गायकवाड (वय 14) असे आहे. 

वेकोलिच्या परिसरात टिळकनगर येते. याच परिसरात मैदान असून, त्याला लागूनच मातीची ढिगारे आहेत. या मैदानावर दररोज युवक फिरणे, खेळणे आणि व्यायामासाठी येतात. 30 ऑक्‍टोबर रोजी टिळकनगरातील मिलिंद गायकवाड हा शाळकरी मुलगा आपल्या मित्रांसोबत मैदानाकडे गेला होता. त्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत घराकडे येण्यास निघाला. मात्र, मैदानात पाण्याची बॉटल राहिल्याची आठवण झाल्याने तो परत मैदानात गेला. तेथेच त्याने मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन स्टंटबाजी सुरू केली. स्टंटबाजी करीत असतानाच तो खाली कोसळला. त्याच्या मानेला जबर मार लागला होता.

बराचवेळ लोटून मिलिंद परतला नसल्याचे पाहून त्याच्या मित्रांनी मैदान गाठले. तेव्हा जखमी अवस्थेत मिलिंद पडून होता. त्याची माहिती त्याच्या आई-वडिलांना देण्यात आली. त्याला सावंगी मेघे येथील दवाखान्यात भरती करण्यात आले होते. मंगळवारी (ता. 12) त्याचा मृत्यू झाला. रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मिलिंद डान्समध्ये नॅशनल चॅम्पियन होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com