बॅडमिंटनपटू किरण माकोडे इंडोनेशियात चमकला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

नागपूर ः जकार्ता (इंडोनेशिया) येथील तौफिक हिदायत बॅडमिंटन एरीनामध्ये झालेल्या एफकेके आंतरराष्ट्रीय करंडक बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरच्या किरण माकोडे यांनी चमकदार कामगिरी केली. स्पर्धेत त्यांनी भारत "अ' संघाचे प्रतिनिधित्व केले. भारताने साखळी सामन्यात जपानचा पराभव केला. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्यांना मलेशियाकडून पराभव स्वीकारावा लागला. तिसऱ्या सामन्यात भारताने म्यानमारचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या सामन्यात किरण माकोडे आणि अरुण धांड यांनी अंग मिंट आणि झॉ मिंट जोडीचा 11-8, 11-10, 11-5 ने पराभव करून भारताला विजय मिळवून दिला.

नागपूर ः जकार्ता (इंडोनेशिया) येथील तौफिक हिदायत बॅडमिंटन एरीनामध्ये झालेल्या एफकेके आंतरराष्ट्रीय करंडक बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरच्या किरण माकोडे यांनी चमकदार कामगिरी केली. स्पर्धेत त्यांनी भारत "अ' संघाचे प्रतिनिधित्व केले. भारताने साखळी सामन्यात जपानचा पराभव केला. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्यांना मलेशियाकडून पराभव स्वीकारावा लागला. तिसऱ्या सामन्यात भारताने म्यानमारचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या सामन्यात किरण माकोडे आणि अरुण धांड यांनी अंग मिंट आणि झॉ मिंट जोडीचा 11-8, 11-10, 11-5 ने पराभव करून भारताला विजय मिळवून दिला. उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघ इंडोनेशियाकडून पराभूत झाला. इंडोनेशिया संघात ऑलिंपिक सुवर्णपदक व माजी विश्‍वविजेता तौफिक हिदायतचा समावेश होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kiran Makode shine in indonesia