
तिवसा : भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत बनावट जन्म दाखले वाटपांवरून महसूल विभागाच्या नाकी नऊ आणले होते. परंतु आता त्यांनी आपला मोर्चा जन्म, मृत्यू घोटाळ्याकडे वळविला असून त्याची खातरजमा करण्यासाठी शुक्रवारी (ता.३०) दुपारी बारा वाजताच्या दरम्यान त्यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली.